'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' कार्यक्रमाच्या परीक्षकाच्या खुर्चीत धर्मेश विराजमान!

लोकप्रिय ‘सोनी मराठी’ वाहिनी लवकर 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' नावाचा नृत्यावर आधारित एक कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' कार्यक्रमाच्या परीक्षकाच्या खुर्चीत धर्मेश विराजमान!

मुंबई : सध्या मालिका विश्वात नृत्यावर आधारित कार्यक्रमांची चालती आहे. यातच आता आणखी एक नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लोकप्रिय ‘सोनी मराठी’ (Sony Marathi) वाहिनी लवकर ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ नावाचा नृत्यावर आधारित एक कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. या कार्यक्रमाच्या परीक्षणाची (Judge) धुरा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक धर्मेश येलांदे (Dharmesh) याच्याकडे सोपवण्यात आली आहे. (Dharmesh will be seen as judge in sony marathi’s new show maharashtra’s best dancer)

नृत्यविश्वातले एक प्रख्यात नाव म्हणजे ‘धर्मेश’. आपल्या नृत्याने धर्मेश एका रियालिटी शोमधून प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर त्याने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. चित्रपट, डान्स शोज करत करत आज ‘धर्मेश सर’ नृत्यक्षेत्रात यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोहोचला आहे. त्याच्या या यशाचे कारण विचारले असता  तो म्हणाला की, ‘त्याच्या आयुष्यात त्याने चान्स घेतला आणि त्याच्या डान्सला मनापासून सादर केलं म्हणून तो आज इथे आहे.’

 

View this post on Instagram

 

Caption plss

A post shared by D (@dharmesh0011) on

अशाच सगळ्या नृत्य कलाकारांसाठी सोनी मराठी वाहिनी ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमातून तोच ‘एक चान्स’ घेऊन आली आहे. या कार्यक्रमाच्या खुर्चीत परीक्षक म्हणून प्रेक्षकांना ‘धर्मेश सर’ पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सुरू झाल्या असू,न सोनी लिव्ह या अॅपवर जाऊन इच्छुक स्पर्धकांनी आपले ऑडिशन व्हिडीओ पाठवायचे आहेत. 4 नोव्हेंबर 2020 ही ऑडिशन पाठवण्याची शेवटची तारीख असणार आहे. आता ऑडिशन प्रक्रिया सुरू झालेले असून, लवकरच निवडलेले स्पर्धक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. (Dharmesh will be seen as judge in sony marathi’s new show maharashtra’s best dancer)

रियालिटी शोचा स्पर्धक ते परीक्षक

‘डान्स इंडिया डान्स’ या कार्यक्रमातून धर्मेश येलांदे प्रसिद्धी मिळाली. याच कार्यक्रमापासून तो ‘धर्मेश सर’ म्हणून ओळखला जाऊ लागला. या यशानंतर त्याने अनेक कार्यक्रम केले. प्रभू देवा निर्मित ‘एबीसीडी’ या चित्रपटात तो मध्यवर्ती भूमिकेत झळकला होता. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या भागातही तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला होता. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटात तो वरूण धवन आणि श्रद्धा कपूरसह महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या शिवाय तो ‘खतरो के खिलाडी’मध्ये ही स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. स्टार प्लसच्या ‘डान्स प्लस’ या कार्यक्रमात देखील तो परीक्षकाची भूमिका बजावत आहे.

(Dharmesh will be seen as judge in sony marathi’s new show maharashtra’s best dancer)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *