
Dhurandar : अभिनेता अक्षय खन्ना स्टारर ‘छावा’ सिनेमानंतर चाहत्यांनी ‘धुरंधर’ सिनेमाला देखील डोक्यावर घेतलं आहे. ‘धुरंधर’ सिनेमा फक्त भारतातच नाही तर, जगभरात मोठे विक्रम रचत आहे.. अशात अक्षय खन्ना याने साकारलेली रेहमान डकैत ही भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली. पण आता अक्षय फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खाजगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आला आहे. नुकताच, अक्षय याची सावत्र आई आणि दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या दुसऱ्या पत्नीने कुटुंबाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अक्षय खन्ना याच्या सावत्र आईच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे…
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, कविता खन्ना यांनी कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. एवढंच नाही तर, त्या असं देखील म्हणाल्या की, कधीच अक्षय आणि राहुल यांची आई होण्याचा प्रयत्न केला नाही. कारण त्यांच्या पूर्वीपासून एक उत्तम आई आहे… जिने कायम मुलांना नात्याचा आदर करायला शिकवलं आहे. कविता हिने असं देखील सांगितलं की, विनोद खन्ना यांच्यासोबत असलेलं नातं फक्त प्रेम आणि आध्यात्मिक बंधावर आधारित होते.
यावर कविता म्हणाली, ‘आईच्या निधनानंतर विनोद खन्ना यांना फार मोठा धक्का बसला होता. त्यांना अनेक प्रश्नांनी घेरलं होतं… ज्यामुळे त्यांनी ओशो आश्रम जाण्याचा निर्णय घेतला… विनोद खन्ना राजकारणात देखील स्वतःचं करियर करायचं नव्हतं…. त्यांचं निधन देखील फार कमी वयात झालं…’ असं देखील कविता म्हणाल्या.
एवढंच नाही तर, अक्षय खन्ना याने देखील वडिलांच्या सन्यांस स्वीकारण्याच्या निर्णयावर स्वतःच मत व्यक्त केलं होतं.. सन्यांस घेण्याचा अर्थ फक्त कुटुंबापासून दूर राहणं नसतं, तुम्हाला सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो… वयाच्या पाचव्या वर्षी अभिनेत्याला हा निर्णय समजू शकला नाही, पण आता त्याला कळतं की एखाद्या व्यक्तीला स्वतःमध्ये खूप खोल बदल आवश्यक असेल तरच तो असं पाऊल उचलतो.
अक्षय खन्ना याने सांगितल्यानुसार, ओशोंचा कम्यून संपला होता म्हणून वडील कुटुंबात परतले. त्यांच्या मते, जर तसं झालं नसतं तर विनोद खन्ना कदाचित कधीच परतले नसते. सांगायचं झालं तर, विनोद खन्ना यांनी 1982 मध्ये अमेरिकेतील ओरेगन स्थित ओशो आश्रममध्ये संन्यास घेतलेला. त्यानंतर 1985 मध्ये ते पुन्हा भारतात परतले आणि 2017 मध्ये विनोद खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला.