AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूड सोडून गावी परतणार होती ‘धुरंधर 2’मधली अभिनेत्री; या कारणामुळे रातोरात पालटलं नशीब

मनासारखं काम न मिळाल्याने बॉलिवूड सोडून गावी परतण्याचा निर्णय या प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला होता. त्यावेळी आईवडिलांनीही तिला 'घरी ये' असं म्हणत पाठिंबा दिला होता. मात्र दोन चित्रपटांनी तिचं नशीब कायमचं पालटलं.

बॉलिवूड सोडून गावी परतणार होती 'धुरंधर 2'मधली अभिनेत्री; या कारणामुळे रातोरात पालटलं नशीब
बॉलिवूड अभिनेत्री
| Updated on: Jul 31, 2026 | 12:38 PM
Share

चित्रपटसृष्टीत असे असंख्य कलाकार आहेत, ज्यांचं अभिनयकौशल्य दमदार आहे, परंतु त्यांना मनासारख्या भूमिका किंवा चित्रपट मिळत नाहीत. सातत्याने बरीच वर्षे मेहनत घेऊनही यश न मिळाल्यास अनेकजण माघार घेत इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतात. बॉलिवूडमधल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत असंच काहीसं घडलं होतं. मनासारखं काम मिळत नसल्याने तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतर एका चित्रपटाच्या ऑफरने तिचं नशीब कायमचं बदललं. त्या अभिनेत्रीला नुकताच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून यामी गौतम आहे.

यामी गौतमने बॉलिवूड सोडून हिमाचल प्रदेशातील तिच्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या कुटुंबीयांनीही तिला पाठिंबा दिला होता. पण मग रातोरात तिचं नशीब पालटलं आणि तिने आपला निर्णय मागे घेतला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द यामीनेच याविषयीचा खुलासा केला आहे. “माझा ‘विकी डोनर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊनही लोकांनी त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं नाही. कधीकधी पुढे जाण्याच्या दबावाखाली येऊन मी अशाही भूमिका स्वीकारल्या आहेत, ज्या खरंतर मला करायच्या नव्हत्या”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

या मुलाखतीत यामीने पुढे सांगितलं, “मी एकदा इंडस्ट्री सोडून घरी परतण्याचा विचार केला होता. ‘उरी’ आणि ‘बाला’ या चित्रपटांच्या आधी मी इंडस्ट्री पूर्णपणे सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी हिमाचलला परत जाईन असं मला वाटलं होतं. तिथे आमची शेतजमीन आहे. मी पूर्णपणे वेगळं आयुष्य सुरू करण्याची कल्पना केली होती. माझ्या आईवडिलांनी मला खूप पाठिंबा दिला. ते फक्त म्हणाले, तू घरी ये. पण ज्याक्षणी मी भीतीपोटी इंडस्ट्रीला चिकटून राहणं सोडलं, त्याक्षणी सर्वकाही बदललं. मला ‘उरी’ आणि ‘बाला’ यांसारख्या चित्रपटांचे ऑफर्स मिळाले. मी भीतीला माझा सर्वांत मोठा शत्रू मानते. ज्यादिवशी मी इंडस्ट्रीतून बाहेर काढलं जाण्याच्या भीतीने ‘हो’ म्हणणं थांबवलं, त्यादिवशी सर्वकाही बदललं.”

यामीला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘आर्टिकल 370’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यामी गेल्या चौदा वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा