AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

19 वर्षीय मुलाने बनवला यामी गौतमचा व्हिडीओ; अभिनेत्री म्हणाली “फोटो काढण्याच्या बहाण्याने त्याने..”

अभिनेत्री आलिया भट्ट दुपारच्या वेळेस तिच्या लिव्हिंग रुममध्ये निवांत बसली होती, तेव्हा दोन अनोळखी लोक तिच्या समोरच्या इमारतीच्या टेरेसवरून कॅमेराने सर्व शूट करत होते. या घटनेवर प्रतिक्रिया देताना यामी गौतमने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला.

19 वर्षीय मुलाने बनवला यामी गौतमचा व्हिडीओ; अभिनेत्री म्हणाली फोटो काढण्याच्या बहाण्याने त्याने..
Yami GautamImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 28, 2023 | 2:36 PM
Share

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टने पापाराझींनी काढलेल्या तिच्या फोटोवरून पोस्ट लिहिल्यानंतर बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी त्यांच्या प्रायव्हसीबाबत व्यक्त झाले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री यामी गौतमने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. यामीच्या मूळ गावी हिमाचल प्रदेशमध्ये एका 19 वर्षीय मुलाने तिच्याकडे फोटोची विनंती केली होती. मात्र त्याऐवजी त्याने यामीच्या परवानगीशिवाय तिचा व्हिडीओ शूट केला आणि तो ऑनलाइन पोस्ट केला. काही दिवसांपूर्वीच आलिया तिच्या घरी असताना काही पापाराझींनी तिच्या समोरच्या इमारतीच्या टॅरेसवरून तिचे फोटो क्लिक केले. हे फोटो पोस्ट करत आलियाने प्रायव्हसीचं उल्लंघन केल्याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला होता.

आलियाचे फोटो क्लिक केल्यानंतर एका मीडिया पोर्टलवर ते पब्लिश करण्यात आले होते. याच घटनेवर यामीला तिची प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी बोलताना सेलिब्रिटी आणि पापाराझी कल्चर यांमध्ये अंतर असण्याची गरज असल्याचं ती म्हणाली.

“आजकाल कोणीही परवानगीशिवाय व्हिडीओ शूट करू लागतो. 19-20 वर्षांचा एक मुलगा माझ्याकडे आला आणि त्याने माझ्या स्टाफकडे फोटोची विनंती केली. सहसा मी लोकांसोबत मोकळेपणे वागण्याचा प्रयत्न करते. माझं गाव खूप लहान होतं, तिथल्या लोकांना भेटण्याची आणि बोलण्याची इच्छा असायची. मीसुद्धा त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असायचे. मला वाटलं की तो मुलगा माझा फोटो काढतोय, मात्र त्याने माझ्या परवानगीशिवाय माझा व्हिडीओ शूट केला. हे खूप वाईट होतं. त्या मुलाने ऑनलाइन तो व्हिडीओ पोस्ट केला आणि त्याला लाखो व्ह्यूज मिळाले होते”, असा प्रसंग यामीने सांगितला.

याविषयी बोलताना ती पुढे म्हणाली, “तुम्हाला असं वाटत असेल की वाह, माझ्या व्हिडीओवर कमेंट्स मिळाले, लाइक्स मिळाले. पण त्यामुळे एखाद्याला तसं करण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं. नेमकं हेच घडलं. बाकीचे लोक पण कॅमेरा घेऊन माझ्या घरी आले आणि माझ्या घराचा व्हिडीओ शूट करू लागले. नेमकं काय घडतंय, हेच मला कळेनासं झालं. कुठेतरी मर्यादेचं पालन केलं पाहिजे, कारण हे सर्व ठीक नाही.”

आलियासोबत नेमकं काय घडलं होतं?

‘तुम्ही मस्करी करताय का? मी माझ्या लिव्हिंग रुममध्ये दुपारी निवांत बसले होते आणि तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी मला पाहतंय. मी उठून पाहिलं तर समोरच्या इमारतीच्या टेरेसवरून दोन व्यक्ती माझ्याकडे कॅमेरा लावून पाहत होते. कोणत्या जगात हे असं करणं योग्य आहे? एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची ही सर्वांत वाईट गोष्ट आहे. एक अशी मर्यादा असते, जी तुम्ही ओलांडू शकत नाही. आज मला हे म्हणावं लागतंय की सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत’, असं लिहित तिने तिच्या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनाही टॅग केलं होतं.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.