AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडचा एकमेव अभिनेता, ज्याने दिलेत 4 ब्लॉकबस्टर चित्रपट, ज्यांनी केली 1000 कोटींची संपत्ती

बॉलिवूडचा एकमेव अभिनेता ज्याने ज्याने 4 चित्रपट दिले ब्लॉकबस्टर. प्रत्येक चित्रपटाने कमावले 1000 हजार कोटी. बनला बॉक्स ऑफिसचा धुरंधर. कोण आहे तो अभिनेता?

बॉलिवूडचा एकमेव अभिनेता, ज्याने दिलेत 4 ब्लॉकबस्टर चित्रपट, ज्यांनी केली 1000 कोटींची संपत्ती
| Updated on: Apr 18, 2026 | 6:46 PM
Share

Bollywood Actor : भारतीय चित्रपटसृष्टीतील चित्रपट केवळ देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. अनेक चित्रपटांनी 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करत बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवलं आहे. प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं की त्याच्या चित्रपटाने या प्रतिष्ठित ‘1000 कोटी क्लब’मध्ये स्थान मिळवावं. शाहरुख खान, प्रभास, अल्लू अर्जुन, ज्युनियर एनटीआर, राम चरण, यश आणि आमिर खान यांसारख्या स्टार्सच्या चित्रपटांनीही या क्लबमध्ये दमदार एन्ट्री घेतली आहे.

मात्र, या सगळ्यांमध्ये एक अभिनेता असा आहे, ज्याच्या तब्बल चार चित्रपटांनी 1000 कोटींचा टप्पा पार केल्याचं सांगितलं जात आहे. तो अभिनेता म्हणजे संजय दत्त.

बॉलिवूड ते साऊथ सर्वत्र दमदार कमाई

संजय दत्तने हिंदीसह दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम केलं आहे. विशेषतः खलनायकाच्या भूमिकांमध्ये त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याच्या अभिनयातील विविधता आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्समुळे तो प्रत्येक भूमिकेत उठून दिसतो.

संजय दत्तचे चार चित्रपट 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील असल्याचं सांगितलं जात आहे. यात केजीएफ 2, जवान, धुरंधर आणि धुरंधर 2 या चित्रपटांचा समावेश आहे.

‘केजीएफ 2’मधील खलनायकाची छाप

केजीएफ 2 हा यश स्टारर चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात संजय दत्तने ‘अधीरा’ हा खलनायक साकारला होता. चित्रपटाने जागतिक स्तरावर सुमारे 1200 कोटी रुपयांची कमाई केली होती.

जवान या शाहरुख खान अभिनित चित्रपटात संजय दत्तचा कॅमिओ भूमिका केली होती. इंटेलिजन्स ऑफिसरच्या भूमिकेत तो झळकला होता. या चित्रपटानेही सुमारे 1100 कोटींचा टप्पा गाठला.

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ची कामगिरी

संजय दत्तच्या ‘धुरंधर’ आणि त्याचा सिक्वेल धुरंधर 2 यांनीही मोठी कमाई केल्याचा दावा केला जात आहे. विशेषतः ‘धुरंधर 2’ने 1750 कोटी रुपयांपेक्षा जास्त कलेक्शन केल्याचं सांगितलं जात आहे. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झाला असून अजूनही सिनेमागृहांमध्ये चालू आहे.

संजय दत्तचा हा विक्रम त्याला इतर अभिनेत्यांपासून वेगळं ठरवतो. बॉलिवूडसोबतच साऊथ चित्रपटांमध्येही आपली छाप सोडणाऱ्या या अभिनेत्याने 1000 कोटी क्लबमध्ये अनेक चित्रपट देत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Follow Us
रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
Jalgaon Banana Loss | रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
Chhatrapati Sambhajinagar | महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त, आकडा जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...