AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय, पण किती अंडी खायची माहितीये? जाणून घ्या महत्त्वाच्या टीप्स

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. त्यामुळे अनेक समस्या डोकं वर काढतात. त्यामधील एक समस्या म्हणजे वाढणारं वजन... अशात अनेक जण वजन कमी करण्यासाठी ठराविक आहार घेतात. त्यामुळे जाणून घ्या योग्य टीप्स...

वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय, पण किती अंडी खायची माहितीये? जाणून घ्या महत्त्वाच्या टीप्स
| Updated on: Jun 05, 2026 | 1:06 PM
Share

वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायामच नाही तर, आहार देखील तितकाच महत्त्वाचा असतो. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी आहारात अंडी असणं फार महत्त्वाचं आहे… पण वजन कमी करताना किती अंडी खायची? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो. एवढंच नाही तर, आपण अंड्यातील पिवळा बलक खाऊ शकतो का? असे अनेक प्रश्न आणि शंका आपल्या मनात येतात. त्यामुळे जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आणि टीप्स माहिती असल्या पाहिजे…

ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांना अंड्यातील पिवळा बलक पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. अंड्याच्या पांढऱ्या भागात फक्त प्रथिने असतात. पण, पिवळ्या बलकामध्ये जीवनसत्त्वे ए, डी, ई, बी12, लोह, जस्त, ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि कोलीन असतात, जे मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये कोलेस्ट्रॉल असतं. पण आहारातील कोलेस्ट्रॉलचा आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलवर तितक्या लवकर परिणाम होत नाही.

जर तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हृदयरोग असेल, तरच तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अंड्यातील पिवळ्या बलकाचे प्रमाण कमी करा. ज्यांना हे आजार नाहीत, त्यांच्यासाठी दिवसातून एक पिवळा बलक खाल्ल्याने वजन कमी होण्यास अडथळा येणार नाही, उलट शरीराला आवश्यक ऊर्जा मिळेल. केवळ अंडी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होणार नाही, ते तुम्ही ती कशी शिजवता यावर अवलंबून आहे.

ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी सकाळी नाश्त्यासोबत उकडलेली अंडी खाणं उत्तम आहे. यामुळे दिवसभर शरीराची चयापचय क्रिया चांगली राहण्यास मदत होईल. जर ऑम्लेट बनवायचंच असेल, तर ते नॉन-स्टिक पॅनमध्ये थोडेसे ऑलिव्ह तेल किंवा खोबरेल तेल वापरून बनवणे उत्तम. तेल जास्त झाल्यास, अंडी खाण्याचे सर्व फायदे नाहीसे होतील.

जर तुम्ही जिममध्ये जात असाल किंवा जोरदार व्यायाम करत असाल, तर तुमच्या शरीराला अधिक प्रथिनांची गरज असते. एका मोठ्या उकडलेल्या अंड्यामध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रथिने असतात. डॉक्टर लहान मुलांना देखील अंडी खाण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला कोणत्या समस्या असतील तर, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या… ज्यामुळे कोणती अडचण येणार नाही.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा