Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने… काय घडतंय पडद्यामागे?
राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. माजी खासदार नवनीत राणा या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू असून, त्यासाठी राणा दाम्पत्याकडून राजकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. नुकतीच नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. माजी खासदार नवनीत राणा या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू असून, त्यासाठी राणा दाम्पत्याकडून राजकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. नुकतीच नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना अधिक वेग आला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा सदस्यत्वामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचा दावा काही राजकीय वर्तुळातून केला जात होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून त्यांना राज्यसभेवर संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र या चर्चांमध्ये आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अद्याप राज्यसभा पोटनिवडणुकीसंदर्भात कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. नवनीत राणा यांच्या नावावर पक्षामध्ये कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसल्याचेही सांगितले जात आहे. राज्यसभा उमेदवारीसाठी पक्षातील अनेक इच्छुक नेते स्पर्धेत असून, उमेदवार निवडीसाठी लवकरच पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, नवनीत राणा यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या वाट्याची जागा त्यांच्यासाठी राखून ठेवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत होणाऱ्या बैठकीनंतर राज्यसभा उमेदवारीचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Published on: Jun 05, 2026 10:46 AM
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...

