AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2: रणवीरच्या ‘धुरंधर 2’कडून सर्वांचीच धुलाई; ठरला बॉक्स ऑफिसचा ‘रेकॉर्ड ब्रेकर’ सिनेमा

Dhurandhar 2 Box Office Collection: रणवीर सिंहच्या 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक नवे विक्रम रचले आहेत. मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकत या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे.

Dhurandhar 2: रणवीरच्या 'धुरंधर 2'कडून सर्वांचीच धुलाई; ठरला बॉक्स ऑफिसचा 'रेकॉर्ड ब्रेकर' सिनेमा
धुरंधर: द रिव्हेंजImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 27, 2026 | 9:16 AM
Share

आजपर्यंत कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाला जे जमलं नाही, ते आता रणवीर सिंहचा ‘धुरंधर 2’ हा चित्रपट करतोय. डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’पेक्षा हा सीक्वेल बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. त्यापेक्षाही दमदार परफॉर्मन्स सध्या थिएटरमध्ये सुरू आहे. 19 मार्च रोजी हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आणि त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 18 एप्रिल रोजी पेड प्रीव्हूय आयोजित करण्यात आले होते. पेड प्रीव्हू आणि गेल्या सात दिवसांची कमाई मिळून ‘धुरंधर 2’ने सर्व रेकॉर्ड्स मोडून इतिहास रचला आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत भारतात या चित्रपटाने 674.17 कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून ग्रॉस कलेक्शनचा आकडा 805.32 कोटी रुपये इतका आहे. तर शुक्रवारपर्यंत देशभरात नेट कमाईचा आकडा 700 कोटी पार होणार असल्याचा अंदाज आहे.

‘धुरंधर 2’चे विक्रम

‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात या चित्रपटाचे सध्या 14170 शोज आहेत. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’च्या हिंदी व्हर्जनने एका आठवड्यात 425 कोटी कमावले होते. तर सर्व सात भाषांमधील सात दिवसांची कमाई 688 कोटी रुपये झाली होती. रणवीरचा ‘धुरंधर 2’ शुक्रवारपर्यंत ‘पुष्पा 2’लाही मात देईल. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात एका भाषेत सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. त्याचप्रमाणे बॉक्स ऑफिसवर अत्यंत जलद गतीने 1000 कोटींचा आकडा पार करण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला आहे. याशिवाय पेड प्रीव्ह्यूमध्ये सर्वाधिक कमाई करणारा आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाईने ओपनिंग करणारा हिंदी चित्रपट.. असेही विक्रम ‘धुरंधर 2’च्या नावावर आहेत. हिंदीत एका दिवसात 100 कोटींचा गल्ला जमवणाराही ‘धुरंधर 2’ हा पहिला चित्रपट ठरला आहे.

मोठमोठ्या चित्रपटांना टाकलं मागे

रणवीरच्या ‘धुरंधर 2’ने ‘जवान’, ‘पठाण’, ‘अॅनिमल’, ‘स्त्री 2’ आणि इतरही काही मोठ्या चित्रपटांना बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत मागे टाकलं आहे. ‘पुष्पा 2’ हा त्याचा सर्वांत मोठा प्रतिस्पर्धी ठरला असून त्याने आधीच अल्लू अर्जुनच्या चित्रपटाच्या जगभरातील कमाईला मागे टाकलं आहे. यावरून हे स्पष्ट होतंय की ‘धुरंधर 2’ने भारतीय सिनेसृष्टीत नवीन मापदंड स्थापित केला आहे.

आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतीय गुप्तहेर पाकिस्तानात जाऊन तिथल्या दहशतवाद्यांचा कसा खात्मा करतो, याबद्दलची ही कथा आहे. यात भारतावरील विविध दहशतवादी हल्ल्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...