AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 3 : ‘धुरंधर 3’ मधून 10 बड्या सेलिब्रिटींचा पत्ता कट, रणवीर सिंग नव्या शत्रूंच्या घेणार बदला

Dhurandhar 3 : ‘धुरंधर 2’ सिनेमाने प्रदर्शनानंतर एका आठवड्यातच सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. बॉक्स ऑफिसवर सिनेमा धुमाकूळ घालताना दिसत आहे… ‘धुरंधर 2’ सिनेमाची चर्चा सुरु असताना ‘धुरंधर 3’ सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. सिनेमाच्या तिसऱ्या भागातून 10 बड्या सेलिब्रिटींचा पत्ता कट करण्यात आला आहे. ‘धुरंधर 3’ मध्ये आता 10 भूमिका दिसणार नाहीत, ज्यांनी पहिल्या […]

Dhurandhar 3 : 'धुरंधर 3' मधून 10 बड्या सेलिब्रिटींचा पत्ता कट, रणवीर सिंग नव्या शत्रूंच्या घेणार बदला
Dhurandhar 3
| Updated on: Mar 27, 2026 | 10:04 AM
Share

Dhurandhar 3 : ‘धुरंधर 2’ सिनेमाने प्रदर्शनानंतर एका आठवड्यातच सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. बॉक्स ऑफिसवर सिनेमा धुमाकूळ घालताना दिसत आहे… ‘धुरंधर 2’ सिनेमाची चर्चा सुरु असताना ‘धुरंधर 3’ सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. सिनेमाच्या तिसऱ्या भागातून 10 बड्या सेलिब्रिटींचा पत्ता कट करण्यात आला आहे. ‘धुरंधर 3’ मध्ये आता 10 भूमिका दिसणार नाहीत, ज्यांनी पहिल्या दोन भागांमध्ये दमदार कामगिरी बजावली आहे… सांगायचं झालं तर, ‘धुरंधर 2’ च्या क्लायमॅक्सपर्यंत अनेक पात्रांची भूमिका संपते… तर जाणून घ्या, ‘धुरंधर 3’ सिनेमात कोणते सेलिब्रिटी दिसणार नाहीत… यादीत सर्वात पहिलं नाव तर, अभिनेता संजय दत्त याचं आहे…

1. एसपी चौधरी अस्लम – सिनेमातील सर्वात तगड्या भूमिकेमधील एक भूमिका म्हणजे चौधरी अस्लम याची… चौधरी अस्लम याची भूमिका अभिनेता संजय दत्त याने साकारली आहे. ‘धुरंधर 2’ मध्ये चौधरी अस्लम याचं अपघाती निधन होतं… अशात सिनेमाच्या तिसऱ्या भागात चौधरी अस्लम या भूमिकेची कमतरता भासेल…

2. मेजर इक्बाल – सिनेमात मेजर इक्बाल याची भूमिका अभिनेता अर्जुन रामपाल याने साकारली आहे… ‘धुरंधर 2’ हमजा म्हणजे अभिनेता रणवीर सिंग त्याची हत्या करतो, त्यामुळे सिनेमाच्या तिसऱ्या भागातून अर्जुन याचा पत्ता कट झालाय.

3. मोहम्मद आलम – भूमिकेत अभिनेता गौरव गेरा यानी गंभीर भूमिका साकारली आहे… सिनेमात त्याने भारतीय स्पायची महत्त्वाची भूमिका बजावली. पण हमजा याला वाचवण्यासाठी त्याने स्वतःचे प्राण पनाला लावले… सिनेमात गोळी लागून त्याची हत्या झाली.

4. पिंडा उर्फ गुरबाज सिंह – सिनेमात पिंडा आणि हमजा यांच्यात वॉशरुममध्ये हाणामारी होते.. अभिनेता उदयवीर संधू याने कुख्यात खलनायकाची भूमिका बजावली आहे… पण या चकमकीत त्याचं निधन होतं. त्यामुळे सिनेमाच्या तिसऱ्या भागातून अभिनेत्याचा पत्ता कट झालाय.

5. जावेद खनानी – हमजाने एका गुप्त मोहिमेदरम्यान अंडरवर्ल्ड आणि दहशतवादी नेटवर्कमधील दुवा असलेल्या जावेद खाननीला ठार केलं. अंकित सागरने ही छोटी पण प्रभावी भूमिका उत्कृष्टपणे साकारली, पण आता त्याची कहाणी संपली आहे.

6. आतिफ अहमद – सलीम सिद्दीकी याने अतिफ अहमद ही एका कट्टर शत्रूची भूमिका बजावली आहे. मिशन धुरंधर दरम्यान, त्याला ठार करण्यात आलं… ज्यामुळे दहशतवादी नेटवर्कचा एक महत्त्वाचा दुवा तुटला.

7. अर्शाद पप्पू – सिनेता मोठा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा, अर्शाद पप्पू याची भूमिका संपते… उझैर बलोचने सर्वांसमोर त्याचा शिरच्छेद केला आणि नंतर त्या डोक्याने फुटबॉल खेळला… हे सिनेमातील सर्वात भयानक दृश्यांपैकी एक आहे. या दृश्याने या फ्रँचायझीमधील अश्विन धरच्या कारकिर्दीचाही शेवट झाला.

8. जहूर मिस्त्री – भूमिका विवेक सिन्हाने साकारली आहे. हमझाने IC 814 हाईजॅकरला हीट लिस्टमध्ये ठेवलं होतं… त्याला संपवून हमजा याने बदला घेतल…

9. अजीम चीमा – अभिनेता विनोद थरानी याने भूमिका साकारली आहे. संपूर्ण कटामागे असलेला लश्कर-ए-तोयबाचा हा सूत्रधार दुसऱ्या भागाच्या अखेरीस मारला गेला.

10. ब्रिगेडियर जहांगीर – ही भूमिका सुविन्दर विक्की याने साकारली आहे. मेजर इक्बाल याच्या वडिलांच्या भूमिकेत अभिनेता झळकला आहे… स्वतःच्या मुलाच्याच हातून त्याची हत्या होते. म्हणून तिसऱ्या भागात सुविन्दर विक्की दिसणार नाही.

‘धुरंधर 3’ मध्ये काय होईल?

‘धुरंधर 3’ मधून आधीच 10 आणि महत्त्वाच्या भूमिकांचा पत्ता कट झालाय, त्यामुळे रणवीर म्हणजे हमजा याच्याकडे नवीन कोणतं आव्हान असेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमात काही मोठ्या अभिनेत्यांची एन्ट्री होणार आहे… जे हमजा याच्या टीमचा भाग असतील. आता सिनेमाच्या तिसऱ्या भागाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...