Aditya Dhar: आधी क्रिकेटच्या मैदानावर नंतर उरी हल्ल्यामुळे भंगलं स्वप्न; जिद्दीच्या जोरावर बनला खरा ‘धुरंधर’

आपल्याला हवी ती गोष्ट मिळाली नाही, तरी भविष्यात त्यापेक्षा काहीतरी उत्तम आपल्या नशिबात लिहिलेलं असतं.. याचा अनुभव 'धुरंधर' फेम दिग्दर्शक आदित्य धरला चांगलाच आला आहे. क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पाहिलेला आदित्य दिग्दर्शक कसा बनला, ते जाणून घ्या..

Aditya Dhar: आधी क्रिकेटच्या मैदानावर नंतर उरी हल्ल्यामुळे भंगलं स्वप्न; जिद्दीच्या जोरावर बनला खरा धुरंधर
Aditya Dhar
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 29, 2026 | 9:59 AM

हा प्रवास एका अशा दिग्दर्शकाचा आहे, ज्याने क्रिकेटच्या मैदानावर भारतासाठी दमदार कामगिरी करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. परंतु हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळाली नसेल तर त्यापेक्षा खूप काही चांगलं आपल्यासोबत घडायचं असतं, ही ओळख या दिग्दर्शकाच्या आयुष्यासाठी तंतोतंत लागू होते. कारण क्रिकेटच्या मैदानावर जरी त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली नसली तरी खऱ्या आयुष्यातील घटनांना फिल्मी फिरकी देऊन त्याने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. क्रिकेटर बनण्याचं स्वप्न भंगलं, आता आपण काय करावं, असे प्रश्न जरी त्याला त्यावेळी खूप मोठे वाटत असले तरी भविष्यात त्याच्यासाठी खूप काही चांगल्या गोष्टी लिहिलेल्या होत्या. अर्थातच त्या चांगल्या गोष्टी त्याच्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि हार न मानण्याच्या जोरावर कमावल्या आहेत. हा दिग्दर्शक दुसरा -तिसरा कोणी नसून ‘धुरंधर’ आदित्य धर आहे. ‘धुरंधर’ची कथा तर प्रेक्षकांना समजली आहे, परंतु ही कथा रचणाऱ्या आदित्याची खरी कहाणी काय आहे? बनायचं होतं क्रिकेटर पण.. आदित्य...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us