AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘किती बकवास गाणं’ म्हणत दिग्दर्शकाने दिला नकार, मात्र, रिलीज होताच ठरलं सुपरहिट, 31 वर्षानंतरही ट्रेंडमध्ये

'किती बकवास गाणं आहे' म्हणत 31 वर्षांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिलेला नकार. मात्र, एका आठवड्यात बदल केल्यानंतर असं काही घडलं, की चित्रपट प्रदर्शित होताच गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट.

| Updated on: May 14, 2026 | 3:39 PM
Share
31 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 1942: A Love Story या चित्रपटातील गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. विशेषतः 'कुछ ना कहो' आणि 'प्यार हुआ चुपके से' ही गाणी आजही सदाबहार मानली जातात.

1 / 6
मात्र, या गाण्यांच्या निर्मितीमागे अनेक रंजक किस्से दडलेले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी हा किस्सा सांगितला आणि उपस्थितांनाही जुन्या आठवणींमध्ये नेले.

2 / 6
या कार्यक्रमातील सर्वात मोठा खुलासा झाला तो 'कुछ ना कहो' या गाण्याबद्दल. हे गाणे संगीतकार R. D. Burman यांनी तयार केले होते. पण सुरुवातीला हे गाणे ऐकल्यानंतर विधू विनोद चोप्रा यांना ते अजिबात आवडले नव्हते. पहिल्या बैठकीत आर. डी. बर्मन यांनी हे गाणे अतिशय वेगवान बीटमध्ये सादर केले होते. ते ऐकून विधू हैराण झाले होते.

3 / 6
त्या काळात काही लोक आर. डी. बर्मन यांचा काळ संपल्याची टीकाही करत होते. मात्र, विधू यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की चित्रपटाचा आत्माच संगीत असतो आणि संगीत प्रभावी नसेल तर अल्बमही चालणार नाही. त्यांनी थेट आर. डी. बर्मन यांना हे गाणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगितले. हे ऐकून पंचम दा दुखावले गेले, पण त्यांनी हार न मानता एका आठवड्याची मुदत मागितली.

4 / 6
एका आठवड्यानंतर आर. डी. बर्मन यांनी पुन्हा विधूंना बोलावले. सुरुवातीला विधूंना वाटले की पुन्हा तेच होणार, पण यावेळी काहीतरी वेगळे घडले. आर. डी. बर्मन हार्मोनियमसमोर बसले आणि त्यांनी कुछ ना कहो ची सुरुवातीची धून वाजवली. ती धून ऐकताच विधू विनोद चोप्रा भारावून गेले. त्यांना त्यात महान संगीतकार S. D. Burman यांच्या शैलीची झलक जाणवली.

5 / 6
आर. डी. बर्मन यांनीही गंमतीने त्या धूनला वडिलांची मालमत्ता असे म्हटले होते. त्या एका आठवड्यात त्यांनी गाण्याला पूर्णपणे नवा आत्मा दिला आणि त्यातून हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर गीत जन्माला आले. आजही 'कुछ ना कहो' आणि 'प्यार हुआ चुपके से' ही गाणी संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये कायम ऐकायला मिळतात.

6 / 6
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम

बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा