AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात रोज मनुका, बडीशेपचे पाणी पिणे म्हणजे आरोग्यासाठी वरदान, ‘हे’ आहेत फायदे

उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी आपण सर्वजण घेत असतो. कारण तीव्र उष्णतेमुळे अनेक समस्या उद्भवतात. यासाठी लोकं अनेकदा शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांचा आधार घेतात. चला तर मग उन्हाळ्यात दररोज सकाळी रिकाम्या पोटी मनुका आणि बडीशेपचे पाणी प्यायल्यास कोणते फायदे आपल्या शरीराला मिळतात ते जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात रोज मनुका, बडीशेपचे पाणी पिणे म्हणजे आरोग्यासाठी वरदान, 'हे' आहेत फायदे
मनुका, बडीशेपचे पाणी Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 14, 2026 | 3:31 PM
Share

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कडक ऊन आणि उष्णतेचे वाढते तापमान शरीरातील सर्व पाणी शोषून घेते. अशा परिस्थितीत पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच तज्ज्ञ उन्हाळ्यात शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवणारे पदार्थ खाण्याची शिफारस करतात. अशावेळेस आयुर्वेदात मनुका आणि बडीशेप दोन्ही शीतल मानले जातात. तर मनुका आणि बडीशेपपासून बनवलेले पाणी तुम्ही जर रोज सकाळी रिकाम्यापोटी प्यायल्याने शरीराला अधिक फायद्याचे ठरते. मनुकांमध्ये लोह, फायबर आणि नैसर्गिक गोडवा असतो, तर बडीशेप पोटाला थंडावा देऊन पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. जेव्हा या दोन्ही गोष्टी रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी या पाण्याचे सेवन केले जाते, तेव्हा ते केवळ शरीराला आतून थंडावा देत नाही, तर अनेक आरोग्यदायी फायदेही देतात. चला तर मग आजच्या लेखात आपण मनुका आणि बडीशेपचे पाणी कसे बनवायचे आणि त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात.

तज्ञ काय म्हणतात?

आयुर्वेद तज्ञ यांच्या मते, उन्हाळ्यात बडीशेप आणि मनुका यांचे पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. मनुका आणि बडीशेप या दोन्हींमध्ये शीतलता देणारा गुणधर्म असल्याने हे पाणी उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते. हे पाणी तुम्ही रोज प्यायल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि त्वचा स्वच्छ होते.

या प्रकारे बनवा मनुका आणि बडीशेपचे पाणी

1 चमचा बडीशेप आणि 4 ते 5 मनुका एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी पाणी गाळून घ्या आणि प्या. तसेच या पाण्यासोबत मनुका चावून खा.

मनुका आणि बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे

शरीराला थंडावा देते – बडीशेपमध्ये थंडाव्याचा प्रभाव असल्याने यापासून तयार पाणी प्यायल्यास उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत होते. मनुका देखील शरीरातील पाण्याची कमतरता कमी करण्यास मदत करतात. दररोज सकाळी त्याचे पाणी प्यायल्याने उष्माघात आणि तीव्र उष्णतेपासून आराम मिळू शकतो.

पोटातील उष्णता आणि बद्धकोष्ठतेपासून आराम – बडीशेप पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर गॅस, आम्लपित्त व पोट फुगणे यांसारख्या समस्या कमी करण्यास मदत करते. तर मनुकांमध्ये फायबर असते, जे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी उपयुक्त मानले जाते. हे पाणी उन्हाळ्यात पोट हलके आणि स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकते.

ऊर्जा वाढवते – मनुकांमध्ये नैसर्गिक साखर आणि लोह असते, जे त्वरित ऊर्जा देतात. जेव्हा तुम्हाला जास्त गरम होत असेल किंवा थकवा जाणवत असेल, तेव्हा बडीशेप आणि मनुकांचे पाणी शरीराला ताजेतवाने करण्यास मदत करू शकते.

त्वचा उजळवते – या पाण्यातील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा नितळ आणि निरोगी दिसते. याच्या नियमित सेवनाने उन्हाळ्यातील मुरुमे आणि कोरडी त्वचा यांसारख्या समस्यांपासून आराम मिळण्यासही मदत होऊ शकते.

बडीशेप आणि मनुका यांचे पौष्टिक मूल्ये

बडीशेपमध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे पचनक्रियेस मदत करतात आणि शरीराला थंडावा देतात.

तर मनुकांमध्ये लोह, नैसर्गिक शर्करा, फायबर, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे याच्या सेवनाने शरीरात ऊर्जा निर्माण होते तर ॲनिमिया कमी करण्यास मदत करतात आणि अशक्तपणा दूर होतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा