
रणवीर सिंहने त्याचा 40 वा वाढदिवस अतिशय खास अनोख्या पद्धतीने साजरा केला, त्याने स्वतःला एक आकर्षक लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही हमर ईव्ही 3एक्स भेट दिली. अलिकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये रणवीर आणि दीपिका पदुकोणच्या घराबाहेर नवीन इलेक्ट्रिक कार दाखवण्यात आली आहे. अंदाजे 4.5 कोटी रुपयांची किंमत असलेली ही गाडी रणवीरची पहिली इलेक्ट्रिक कार आहे आणि या कारला घेऊन सोशल मीडियावर बरीच चर्चा निर्माण झाली आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण अभिनेता रणवीर सिंह याच्या लक्झरी कार कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात.
Hummer EV 3X ही जगातील सर्वात पॉवरफुल आणि स्टायलिश इलेक्ट्रिक एसयूव्हींपैकी एक मानली जाते. तिची मोठी बॉडी, पॉवरफुल परफॉर्मेंस आणि उच्च तंत्रज्ञान असलेली ही गाडी इतर कारपेक्षा वेगळी आहे. या मॉडेलमध्ये तीन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत, ज्या जागतिक आवृत्तीत 1000 एचपी पर्यंत पावर देतात. ही कार काही सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग पकडते आणि ऑफ-रोडिंगमध्ये देखील अत्यंत सक्षम आहे. म्हणूनच हे मॉडेल बॉलिवूड स्टार्समध्ये खूप लोकप्रिय होत आहे.
रणवीर सिंहच लक्झरी कार कलेक्शन
रणवीर सिंग त्याच्या महागड्या आणि स्टायलिश कार कलेक्शनसाठी आधीच ओळखला जातो. त्याच्या नवीन हमर ईव्ही 3X ने या कार कलेक्शनमध्ये आणखी प्रभावी भर टाकली आहे. त्याच्याकडे कोट्यवधी किमतीच्या अनेक कार आहेत, ज्यात Range Rover Autobiography, Lamborghini Urus, Aston Martin Rapide S, Mercedes Maybach GLS 600 4Matic, आणि Jaguar XJ L या कार्सचा समावेश आहे. प्रत्येक कार स्वतःच्या पद्धतीने अद्वितीय आहे. काही स्पोर्टी परफॉर्मन्स देतात तर काही आलिशान अनुभव देतात.
रणवीर सिंग बनला Hummer EV 3Xचा पहिला बॉलीवूड मालक
Hummer EV 3X खरेदी करून रणवीर सिंग अशा काही मोजक्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाला आहे ज्यांच्याकडे इतकी महागडी इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. ही खरेदी केलेली महागडी कार रणवीरची विशेषतः लक्झरी आणि उच्च-कार्यक्षमता असलेल्या वाहनांबद्दलची आवड दर्शवते. त्याची नवीन हम्मर ईव्ही केवळ त्याच्या कलेक्शनमध्ये भर घालत नाही तर त्याच्या कारच्या निवडीच्या कलेक्शनमध्येही भर घालते.