Dhurandhar Shooting: पाकिस्तानमध्ये झालं ‘धुरंधर’चे शूटिंग? सिनेमातील रहमान डकैतच्या भावाने दिली मोठी माहिती
Dhurandhar Shooting: सोशल मीडियावर सध्या दावा केला जात आहे की 'धुरंधर' चित्रपटाचे शुटिंग हे पाकिस्तानमध्ये करण्यात आले आहे. आता यावर चित्रपटातील रहमान डकैतचा भाऊ उजैर बलोचने प्रतिक्रिया दिली आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाचे शुटिंग नेमकं कुठे झालं?

सध्या सर्वत्र एकाच चित्रपटाची चर्चा रंगली आहे. तो चित्रपट म्हणजे आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर.’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने 2025 वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये स्थान पटकावले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे की रणवीर सिंगचा धुरंधर हा सिनेमा पाकिस्तानमध्ये शूट करण्यात आला आहे. पण आता या बाबात माहिती समोर आली आहे. धुरंधरचे शुटिंग हे पाकिस्तान किंवा भारतात झालेले नाही. तिसऱ्याच एका देशात मोठा सेट उभारण्यात आला होता. आता हा देश कोणता चला जाणून घेऊया…
पाकिस्तानमध्ये झालं चित्रपटाचं शुटिंग?
धुरंधर चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. चित्रपटातील कथा आणि पात्र यांबाबत सर्वत्र विशेष चर्चा सुरु आहे. त्यासोबतच चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनबाबतही विविध बातम्या समोर येत आहेत. चित्रपटातील सुमारे ८० टक्के दृश्य पाकिस्तानातील दाखवण्यात आली आहेत. याच आधारावर हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होत आहे की धुरंधरच्या निर्माते चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी पाकिस्तानात का गेले होते?
वाचा: कधीकाळी मुंबईचा डॉन, त्याचीच सुंदर मुलगी आता मागतेय भीक, त्या राजकुमारीवर अशी वेळ का आली?
धुरंधर चित्रपटाचे शूटिंग कुठे झाले?
एका रिपोर्टनुसार भारत आणि पाकिस्तानातील परस्पर मतभेदांमुळे तिथे कोणत्याही चित्रपटाची शूटिंग करण्याची परवानगी नाही. याच आधारावर धुरंधरच्या निर्मात्यांनी पंजाबमधील चंदीगड आणि लुधियाना येथे चित्रपटाचा मोठा भाग शूट केला. कराचीचा ल्यारी भाग असलेला सेट मुंबई फिल्म सिटीमध्ये चित्रित करण्यात आला आहे, तर लडाख आणि नवी दिल्लीतील अनेक दृश्य शूट करण्यात आली आहे. याशिवाय बँकॉकमध्येही धुरंधरची काही दृश्य शूट करण्यात आली आहेत.
धुरंधर चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत पूर्ण माहिती नुकतीच रहमान डकैत (अक्षय खन्ना)चा भाऊ उजैर बलोचची भूमिका साकारणारा अभिनेता दानिश पंडोर यांनी एका मुलाखतीमध्ये दिली आहे. जेव्हा त्यांना पाकिस्तानमध्ये चित्रपटाच्या शूटिंगबाबत प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि त्यानंतर त्यांनी चित्रपटाचे शुटिंग झालेल्या लोकेशनचा उल्लेख केला.
बॉक्स ऑफिसवर धुरंधरचा दबदबा
धुरंधरच्या रिलीज होऊन आज सहा दिवस झाले आहेत आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 170 कोटींच्या जवळपास व्यवसाय करून केला आहे, तर जागतिक कमाईचा आकडा 200 कोटींच्या जवळ पोहोचला आहे.
