AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘….दृष्ट सावत्र आई’, सावत्र मुलीच्या फोनमध्ये दिया मिर्झाचं नाव, कसं आहे दोघींचं नातं?

अभिनेत्री दिया मिर्झा सध्या चित्रपटांपेक्षाही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे तिने दिलेली मुलाखत. कारण या मुलाखतीत तिने तिच्या सावत्र मुलीसोबत तिचे नाते कसे आहे आणि ती तिच्या मुलीच्या नजरेत सावत्र आई म्हणून कशी आहे याबाबत तिने सांगितलं आहे. हे जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

'....दृष्ट सावत्र आई', सावत्र मुलीच्या फोनमध्ये दिया मिर्झाचं नाव, कसं आहे दोघींचं नातं?
Dia Mirza revealed what her relationship with her stepdaughter Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 03, 2025 | 3:49 PM
Share

2001 मध्ये ‘रहना है तेरे दिल में’या चित्रपटातून दिया मिर्झाने पदार्पण केले होतं. तेव्हापासून ती चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. पडद्यावर आपल्या देखण्या उपस्थितीने प्रेक्षकांची मने जिंकणारी दिया सामाजिक विषयांवर आपले मत व्यक्त करण्यासाठी देखील चर्चेत असते.अलीकडेच दिया मिर्झाने तिचे कुटुंब, बालपण आणि दिवंगत सावत्र वडील अहमद मिर्झा आणि तिच्या आयुष्यातील त्यांची भूमिका याबद्दल उघडपणे चर्चा केली.यासोबतच तिने तिची सावत्र मुलगी समायरा रेखीबद्दलही एक खुलासा केला आणि तिच्या सावत्र मुलीच्या फोनमध्ये तिचा नंबर कोणत्या नावाने सेव्ह केला होता हे सांगितले.

दिया मिर्झाचे परीकथांबद्दलचे मत एका मुलाखतीत दिया मिर्झाने तिच्या सावत्र पालकांच्या भूमिकेबद्दल सांगितले आणि म्हणाली की तिच्या बालपणात तिने परी कथा वाचल्या नाहीत याबद्दल ती आभारी आहे. दियाचं असं म्हणणं आहे की सहसा परी कथांमध्ये सावत्र वडील किंवा आईला खलनायक म्हणून दाखवले जातं मात्र तिचा अनुभव यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.तसेच तिने तिची सावत्र मुलगी समायरासोबतचे तिचे सावत्र आई म्हणून नाते कसे आहे ते सांगितले आहे.

दिया मिर्झाचा नंबर समायराच्या फोनमध्ये कोणत्या नावाने सेव्ह  

दिया मिर्झाने सांगितलं की तिची सावत्र मुलगी समायरा हिने तिचा नंबर तिच्या फोनमध्ये ‘अजूनतरी वाईट सावत्र आई नाही’ या नावाने सेव्ह केला होता. दिया म्हणाली ‘देवाचे आभार मानते की मी लहानपणी परीकथा वाचल्या नव्हत्या. या परीकथांमध्ये, सावत्र वडील आणि सावत्र आई नेहमीच वाईट असतात.’ यासोबतच, तिने पती वैभव रेखीची मुलगी समायरा हिच्या आई होण्याचा तिचा सध्याचा अनुभव आणि तिचे दिवंगत सावत्र वडील अहमद मिर्झाशी संबंधित आठवणी देखील शेअर केल्या.

दिया तिच्या सावत्र वडिलांच्या खूप जवळ होती

दिया मिर्झाची आई दीपा हिने अहमद मिर्झासोबत लग्न केलं जेव्हा दिया 6 वर्षांची होती. वडिलांची आठवण काढत दिया म्हणाली ‘जेव्हा अब्बा आणि आईचे लग्न झाले तेव्हा मी त्यांना अब्बा म्हणू लागले. मी त्यांना माझ्या मनापासून स्वीकारले होते. 2003 मध्ये जेव्हा त्यांनी मला मिठी मारली आणि निरोप देताना त्याच्या डोळ्यात अश्रू होते तेव्हाची ती वेळ मी कधीही विसरणार नाही.’ 2003 मध्ये, दिया तिच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात जात होती, याच प्रवासादरम्यान तिच्या सावत्र वडिलांचे निधन झाले होते.

2021 मध्ये वैभव रेखीसोबत लग्न

दिया मिर्झाने 2021 मध्ये वैभव रेखीशी दुसरे लग्न केले. अभिनेत्रीने अचानक लग्न करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. लग्नाच्या काही महिन्यांनंतर, तिने एका मुलाला जन्म दिला. दिया आणि वैभव दोघांचेही हे दुसरे लग्न होते. वैभवला त्याच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगी आहे, तिचे नाव समायरा आहे. दियाचे समायरासोबत खूप चांगले नाते आहे, अनेक प्रसंगांमधून ते दिसूनही आले. एवढंच नाही तर दियाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ” तिला समायासोबत एक सावत्र आई या नात्यापेक्षा तिची मैत्रिण म्हणून तिच्याशी नाते जपायचे आहे” तसेच तिने समायराही तिला कधीही सावत्र आई म्हणून पाहत नाही. ती देखील दियावर खूप प्रेम करत असल्याचं दिसून येत.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.