
Hardik Pandya And Mahieka Sharma Marriage : भारतीय क्रिकेटर संघाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अॅक्ट्रेस-मॉडेल माहिका शर्मा या दोघांची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्याने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर माहिकासोबत काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. याच फोटोंसोबत त्याने बिक-3 असं कॅप्शन दिलंय. अगस्त्य, पेट डॉग आणि माहिका अशा तीन गोष्टी मला आयुष्यात खूप महत्त्वाच्या आणि आवडत्या आहेत, असं हार्दिकनं या पोस्टच्या माध्यमातून म्हटलं आहे. दरम्यान, हार्दिकनेच पोस्ट केलेल्या एका व्हिडीओची एका वेगळ्या कारणामुळे चर्चा होत आहे. हा व्हिडीओ पाहून हार्दिक आणि माहिका यांनी गुपचूप लग्न तर केलं नाही ना? असे विचेरला जात आहे. व्हिडीओत दोघेही प्रार्थना करताना दिसत आहेत.
हार्दिकने शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. हाच व्हिडीओ पाहून या दोघांनीही लग्न तर केलं नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण या व्हिडीओत हार्दिक आणि माहिका प्रार्थना करत आहेत. विशेष म्हणजे माहिकाच्या बोटामध्ये हिऱ्याची एक अंगठी दिसत आहे. हीच आंगठी पाहून हार्दिकने माहिकाला पत्नी म्हणून स्वीकारलेलं आहे का? असा प्रश्न त्यांचे फॅन्स विचारत आहेत. या व्हिडीओत दोघेही पारंपरिक कपड्यांमध्ये दिसत आहेत. दोघेही एकत्र प्रार्थना म्हणत आहेत. त्यामुळेदेखील अनेक चर्चांना उधाण आले आहे. या चर्चेवर मात्र हार्दिक किंवा माहिका या दोघांनीही अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.
हार्दिकने या व्हिडीओसोबतच काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत. यातील काही फोटोंमध्ये तो माहिकासोबत जीममध्ये दिसतोय. एका फोटोमध्ये तर हार्दिकने माहिकाला थेट उचलून घेतलं आहे. हे फोटो पाहून ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सध्यातरी हार्दिक-माहिका एकमेकांच्या प्रेमात आहेत. त्यांच्या लग्नाची चर्चा होत असली तरी अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत वृत्त समोर आलेले नाही. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.