सनी लियोनीबाबत महेश भट्ट यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, लोक तिला…

'जिस्म 2' चित्रपटात सनी लिओनी असल्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये केली प्रचंड गर्दी. पण तिला बघताच अनेक उपस्थित केले प्रश्न. महेश भट्ट यांचे उत्तर ठरले होते चर्चेचा विषय.

सनी लियोनीबाबत महेश भट्ट यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, लोक तिला...
| Updated on: Aug 03, 2026 | 8:20 PM

अभिनेत्री सनी लिओनी हिने बॉलिवूडमध्ये केलेली एंट्री आजही चर्चेचा विषय ठरते. आता दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट यांनी अनेक वर्षांनंतर सनी लिओनीला ‘जिस्म 2’ या चित्रपटासाठी कसे निवडले यामागची रंजक कहाणी सांगितली आहे.

महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्या काळात पूजा भट्ट ‘जिस्म 2’ची निर्मिती करत होत्या. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते, मात्र मुख्य अभिनेत्रीची निवड अद्याप झाली नव्हती. त्याचवेळी सनी लिओनी बिग बॉस 5 मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. एका प्रौढ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीला अशा लोकप्रिय कौटुंबिक शोमध्ये संधी दिल्याने मोठी चर्चा रंगली होती.

गूगलवर सनी लिओनीचे नाव चर्चेत

महेश भट्ट यांनी सांगितले की, त्यावेळचे वायकॉम 18 चे मुख्य कार्यकारी अधिकारी राज नायक यांनी त्यांना बिग बॉसच्या घरात जाऊन सनी लिओनीची भेट घेण्याचा आणि तिला चित्रपटासाठी साइन करण्याचा सल्ला दिला. भेटीनंतर सनीमध्ये अभिनयाची क्षमता असल्याचे त्यांना जाणवले आणि त्यांनी पूजा भट्ट यांना तिलाच ‘जिस्म 2’साठी घेण्याचा सल्ला दिला.

महेश भट्ट यांनी आणखी एक महत्त्वाचा खुलासा करत सांगितले की, ‘जिस्म 2’ प्रदर्शित होण्यापूर्वीच एका वितरकाने चित्रपट न पाहताच मोठ्या रकमेत त्याचे वितरण हक्क विकत घेतले. त्यामागचे कारण विचारले असता, ‘सनी लिओनी त्या काळात भारतात गूगलवर सर्वाधिक शोधल्या जाणारी अभिनेत्री होती. तिच्या लोकप्रियतेमुळेच चित्रपट चालेल’ असे त्या वितरकाने सांगितल्याचे त्यांनी नमूद केले.

थिएटरमध्ये मोठी गर्दी

मात्र, महेश भट्ट यांच्या मते चित्रपट अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरला नाही. प्रेक्षकांना सनी लिओनीकडून अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस भूमिका पाहण्याची अपेक्षा होती, पण चित्रपटात वेगळी कथा मांडण्यात आली. त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. तरीही चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत थिएटरमध्ये मोठी गर्दी खेचली आणि पहिल्या प्रदर्शनात सुमारे 30 कोटी रुपयांची कमाई केली.

सनी लिओनीच्या प्रवासाबद्दल बोलताना महेश भट्ट म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात स्वतःला बदलण्याची संधी मिळायला हवी. प्रौढ चित्रपटसृष्टीत काम केले म्हणून एखादी व्यक्ती कायम त्याच चौकटीत राहते, असे नाही. त्यांनी सनीच्या अभिनय प्रवासाचे कौतुक करत अनुराग कश्यप यांच्या केनेडी या चित्रपटातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us