Vastu Shastra : श्रावण महिन्यात या वस्तू आवश्य घरी आणा, महादेवाच्या आशीर्वादाने आयुष्यात कधी पैशांची कमी पडणार नाही
आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिन्याला अतिशय पवित्र महिना मानलं जातं. श्रावण महिना हा भगवान महादेव यांना समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यात भगवान महादेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. तसेच काही अशा वस्तू आहेत, ज्या या महिन्यात घरी आणणं शुभ मानलं जातं.

श्रावण महिन्याला लवकरच सुरुवात होत आहे. श्रावण महिना हा भगवान महादेवांना समर्पित आहे. हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये श्रावण महिन्याला पवित्र माण्यात आलं आहे. या महिन्यात भगवान महादेवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही या काळात महादेवांची उपासना केली तर तुम्हाला तुमचं इच्छित फळ मिळत अशी मान्यता आहे. त्यामुळेच श्रावण महिन्यात लोक घरात सुख, समृद्धी यावी आणि घरातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी विविध धार्मिक पूजापाठ करत असतात, तसेच हा महिना सणांचा महिना म्हणून देखील ओळखला जातो, या महिन्यात अनेक सण आणि व्रतं असतात. वास्तुशास्त्रानुसार अशा काही वस्तू आहेत, त्या जर तुम्ही श्रावण महिन्यात तुमच्या घरी आणल्या तर तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते, आज आपण अशाच काही वस्तूंबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
शिवलिंग – जर तुमच्या घरात शिवलिंग नसेल तर तुम्ही श्रावण महिन्यात तुमच्या देवघरात ठेवण्यासाठी शिवलिंग आणू शकता. श्रावण महिना हा भगवान महादेव यांना समर्पित आहे, त्यामुळे या काळात न चुकता दररोज भगवान महादेव यांची पूजा झाली पाहिजे, त्यासाठी तुम्ही तुमच्या देवघरात ठेवण्यासाठी शिवलिंग आणू शकता. श्रावण महिन्यात दररोज या शिवलिंगाची पूजा केल्यास महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील, आणि तुमच्या सर्व इच्छा महादेवांच्या कृपेनं पूर्ण होतील असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. फक्त तुम्ही तुमच्या देवघरात ठेवण्यासाठी जे शिवलिंग घेणार आहात ते घेताना एक गोष्ट लक्षात ठेवावी, हे शिवलिंग अंगठ्याच्या आकारापेक्षा जास्त मोठं असू नये, तसेच तुम्ही जर मंदिरासाठी शिवलिंग घेणार असाल तर ते शक्यतो मोठे असावे असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
शंख – हिंदू धर्मशास्त्रामध्ये शंखाला विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही झोपेतून उठला आणि शंखाचा ध्वनी तुमच्या कानावर पडला, तुम्ही शंखनाद ऐकला तर तुमचा दिवस चांगला जातो. आर्थिक प्राप्तीच्या नव्या संधी समोर येतता. कोणत्याही देवघरातील पूजा ही शंखा शिवाय अर्पूण आहे, असं मानलं जातं, त्यामुळे देव पूजा करताना शंख हा तुमच्याकडेच असलाच पाहिजे, असं सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.
गंगेचं पाणी – वास्तुशास्त्रानुसार आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार गंगा नदीला अत्यंत पवित्र माण्यात आलं आहे. अनेक लोक आपल्या पापाचं प्रायचित्त करण्यासाठी गंगा नदीच्या पाण्याने एकदा तरी अंघोळ करतात. गंगा नदीच्या पाण्याचा वापर हा देवपूजेत देखील केला जातो. त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी घरात गंगेचे पाणी आणावं, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
