राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचं विकी कौशलच्या भावाशी ब्रेकअप; समोर आलं थक्क करणारं कारण

राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आणि बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. शर्वरी ही विकी कौशलचा भाऊ आणि अभिनेता सनी कौशलला डेट करत होती. मात्र आता त्यांचं ब्रेकअप झाल्याचं कळतंय.

राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचं विकी कौशलच्या भावाशी ब्रेकअप; समोर आलं थक्क करणारं कारण
बॉलिवूड अभिनेत्री
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 18, 2026 | 9:14 AM

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघ सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चत आहे. यामागचं कारण म्हणजे एकापाठोपाठ एक येणारे तिचे दमदार चित्रपट. ‘मुंज्या’ आणि ‘महाराज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्यानंतर आता शर्वरी बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शिक इम्तियाज अलीच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटात तिने अभिनेता वेदांग रैनासोबत मुख्य भूमिका साकारली आहे. थिएटरमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. मात्र त्याचसोबत शर्वरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. शर्वरी ही अभिनेता विकी कौशलचा भाऊ सनी कौशलला डेट करत होती. बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यांपैकी यांची एक जोडी होती. मात्र या दोघांच्या नात्यात कटुता निर्माण झाली असून ब्रेकअपमागील कारण समोर आलं आहे.

2020 मध्ये कबीर खानच्या ‘द फरगॉटन आर्मी- आझादी के लिए’ या वेब सीरिजमध्ये एकत्र काम करताना शर्वरी आणि सनी एकमेकांच्या प्रेमात पडले. तेव्हापासून दोघं डेट करू लागले होते. हे दोघं माध्यमांसमोर कधी मोकळेपणे व्यक्त झाले नसले तरी त्यांच्या रिलेशनशिपची इंडस्ट्रीत चांगलीच चर्चा होती. सनी कौशलने ‘गोल्ड’ (2018), ‘शिद्दत’ (2021), ‘चोर निकल के भागा’ (2023) आणि ‘फिर आई हसीन दिलरुबा’ (2024) यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र जेव्हा शर्वरीच्या करिअरला ‘मुंज्या’नंतर मोठं वळण मिळालं, तेव्हा या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला.

विकी कौशलचा भाऊ-


‘मुंज्या’ आणि नेटफ्लिक्सवरील ‘महाराज’ यांसारख्या चित्रपटांच्या यशानंतर शर्वरी इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या तरुण अभिनेत्रींपैकी एक ठरली. यशराज फिल्म्सशी जोडलं गेल्याने तिच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. इंडस्ट्रीतील चर्चांनुसार, त्यांच्या प्रोफेशनल लाइफमधील फरकामुळे दोघांच्या नात्यावर परिणाम झाला, असं म्हटलं जातंय. काहींनी या दोघांमधील नात्याच्या परिस्थितीचं वर्णन ‘अभिमान’ या चित्रपटासारखी असल्याचं केलं. आज शर्वरी सनी कौशलपेक्षा जास्त प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. 2025 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला आणि त्यामागे हे एक कारण होतं.

सनी किंवा शर्वरी या दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपमागील कारणाला सार्वजनिकरित्या कधीच दुजोरा दिलेला नाही. सध्या शर्वरीचं नाव मात्र तिचा सहकलाकार वैदांग रैनासोबत जोडलं जात आहे. जरी या दोघांचा ‘मैं वापस आऊंगा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नसला तरी त्यांच्यातील वाढत्या जवळीकीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याचदरम्यान वेदांगचंही त्याची गर्लफ्रेंड खुशी कपूरसोबत ब्रेकअप झालं आहे. शर्वरीप्रमाणेच तोसुद्धा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मौन बाळगून आहे.

Follow Us