सई ताम्हणकरचं 27 व्या वर्षी झालेलं लग्न, 24 महिन्यात घटस्फोट, कोण होता ‘तो’?

Sai Tamhankar Marriage Life: लग्नाच्या 24 महिन्यांनंतर झालेलं सई ताम्हणकर हिचा घटस्फोट... कोण होता नवरा? सई कायम सौंदर्य आणि खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

सई ताम्हणकरचं 27 व्या वर्षी झालेलं लग्न, 24 महिन्यात घटस्फोट, कोण होता तो?
फाईल फोटो
| Updated on: Aug 21, 2025 | 2:00 PM

Sai Tamhankar Marriage Life: अभिनेत्री सई ताम्हणकर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही… अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत सई हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे सईच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली आहे. आज सई फक्त मराठीच नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय आहे. सई ताम्हणकर फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सई आता 39 वर्षांची आहे. पण पैसा, संपत्ती, लोकप्रियता असून देखील अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत आहे.

असं नाही की, सईच्या खासगी आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली नाही… असं काहीही नाही. अभिनय विश्वात पाय ठेवून सई हिला फक्त 4 वर्ष झाली होती. झगमगत्या विश्वात काम करत असतान अभिनेत्री व्हिज्युअल इफेक्ट्स आर्टिस्ट याच्या प्रेमात पडते. दोघे लग्न देखील करतात.

सई ताम्हणकरने 15 डिसेंबर 2013 रोजी अमेय गोसावी नावाच्या व्हिज्युअल इफेक्ट्स कलाकाराशी लग्न केलं. अमेय चित्रपट उद्योगाशी देखील संबंधित आहे. तो एक निर्माता आहे आणि त्याच्या कंपनीचे नाव लोडिंग पिक्चर्स आहे. सई आणि अमेय दोघेही एकाच क्षेत्रात काम करत होते. पण दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही…

सई ताम्हणकर आणि अमेय गोसावी लग्नापूर्वी तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. जेव्हा अमेय आणि सईने लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचे कुटुंब आणि मित्र खूप आनंदी होते. 7 एप्रिल 2012 रोजी त्यांचा साखरपुडा झालेला. दोघे लवकरच लग्न करणार होते. पण कामात व्यस्त असल्यामुळे सई आणि अमेय यांनी एक वर्ष लग्न पुढे ढकललं.

15 डिसेंबर 2013 रोजी मराठी रितीरिवाजानुसार त्यांचं लग्न झालं. त्यावेळी सई 27 वर्षांची होती. हे लग्न जास्त काळ टिकलं नाही. 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला आण सईने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

सई हिने आतापर्यंत अनेक सिनेमे आणि सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘डब्बा कार्टल’, ‘मानवत मर्डर’, ‘क्राईम बीट’, ‘पेट पुराण’ आणि ‘सामांतर’ या सीरिजमध्ये काम केलं आहे. शिवाय ‘मिमी’, ‘भक्षक’ आणि ‘ग्राउंड झिरो’ या हिंदी सिनेमात देखील अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका बजावली आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं…