
Kantara Chapter 1: दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी स्टारर ‘कांतारा चॅप्टर 2’ सिनेमा सध्या अनेक विक्रम रचताना दिसत आहे. सिनेमाने आतापर्यंत 600 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिस बक्कळ कमाई करताना दिसत आहे. तर दुसरीकडे, सिनेमातील एक सीन तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिग्दर्शकाकडून मोठी चूक झाली आहे. ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडियावर सीनमधील एक स्क्रीन शॉट देखील व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र सिनेमातील त्या एका चुकीची चर्चा रंगली आहे.
‘कांतारा चॅप्टर 1’ मध्ये अखेर काय झालाय ब्लंडर?
सध्या सोशल मीडियावर जो स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे, तो ‘ब्रह्मकलश’ गाण्यातील आहे. गाण्यातील एका सीनमध्ये लोकं जेवताना दिसत आहे. सर्वकाही परफेक्ट असताना, तेथे पाण्याची प्लास्टीकची बॉटल हटवण्यास दिग्दर्शक विसरला. गाण्यातील 20 लिटरच्या प्लास्टीकच्या बॉटलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सर्वांना ही गोष्ट खटकली आहे आहे, सिनेमाची कशा चौथ्या शतका भोवती फिरताना दिसत आहे. तेव्हा कदंब राजवंशाचे तिथे राज्य होते.
#KantaraChapter1
Mistake shot plastic water can video song 3:06 pic.twitter.com/xLVIiQcgwR— rio raz🖤 (@razworldd) October 11, 2025
त्यावेळी प्लास्टिक अस्तित्वात देखील नव्हतं. सिनेमातील सीन लोकांना 2019 च्या “गेम ऑफ थ्रोन्स” वेब सिरीजची आठवण करून देत आहे. ज्यामध्ये स्टारबक्सच्या कॉफीचा कप आला होता. ‘कंतारा चॅप्टर 1’ मधील सीन लोक ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मधील चूक म्हणूनही पाहत आहेत.
सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त गाण्यातील 20 लिटरच्या प्लास्टीकच्या बॉटलची चर्चा सुरु आहे. फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणालास ‘कांतारा चॅप्टर 1’ मध्ये एक किरकोळ सातत्य त्रुटी लक्षात आली. एका दृश्यात प्लास्टिकची पाण्याची बाटली दिसते. ती काढून टाकली तर बरं होईल…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘ही चूक पाहून खूप वाईट वाटतं, कारण सिनेमात खूप काळजी आणि बारकाव्यांकडे लक्ष दिलं गेलं आहे.’
2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कांतार चॅप्टर 1’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. सिनेमाने 11 दिवसात भारतात जवळपास 440 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरात सिनेमाने 600 कोटींचा आकडा ओलांडलेला आहे. सिनेमात ऋषभ शेट्टी याच्यासोबत रुक्मणि वसंत, गुलशन देवैया आणि जयराम यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.