AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स; तरी दीपिका बंद करणार युट्यूब चॅनल? शोएब म्हणाला..

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर तिच्या आरोग्याच्या समस्यांमुळे युट्यूब चॅनल बंद करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर अखेर तिचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिमने प्रतिक्रिया दिली आहे.

40 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स; तरी दीपिका बंद करणार युट्यूब चॅनल? शोएब म्हणाला..
Dipika Kakar Image Credit source: Instagram
| Updated on: May 06, 2026 | 10:18 AM
Share

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. गेल्या काही महिन्यांपासून दीपिका आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करतेय. गेल्या वर्षी तिला लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. यावरील उपचार झाल्यानंतर दीपिकाच्या पोटात सिस्ट आढळले होते. त्यावरही सर्जरी करण्यात आली होती. एकानंतर एक सुरू असलेल्या आरोग्याच्या या समस्यांमुळे कुटुंबाकडे आणि मुलाकडे पुरेसं लक्ष देता येत नसल्याचं तिने बोलून दाखवलं होतं. आता त्याच कारणामुळे युट्यूब चॅनलसुद्धा दोघं बंद करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दीपिका आणि शोएब यांचे युट्यूबवर चॅनल असून त्यावर ते व्लॉग पोस्ट करत सतत चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी ते या व्लॉगद्वारे सांगत असतात. त्यांच्या चॅनलला फॉलो करणाऱ्यांचा आकडाही खूप मोठा आहे.

युट्यूब चॅनल बंद करणार असल्याच्या चर्चांवर अखेर शोएबने उत्तर दिलं आहे. दीपिका आणि तो युट्यूब चॅनल्स बंद करणार असल्याच्या चर्चा खोट्या असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. इतकंच नव्हे तर भविष्यात नवनवीन व्लॉग्स पोस्ट करून त्याद्वारे नवीन कंटेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचं तो म्हणाला. “दीपिका आणि मी युट्यूबवर जास्तीत जास्त सक्रिय राहण्याचा विचार करत आहोत. दर आठवड्याला आम्ही किमान दोन व्हिडीओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत”, अशी माहिती शोएबने दिली आहे. यावेळी शोएबने त्याच्या व्लॉग्सला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल चाहत्यांचे आभार मानले.

View this post on Instagram

A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

“मी व्लॉग्समध्ये माझी मतं अत्यंत प्रामाणिकपणे मांडत असतो. कधीकधी काही विशिष्ट परिस्थितींमध्ये व्लॉग्स बनवणं शक्य नसतं. तरीही दररोज व्लॉग्स सादर करण्यासाठी मी सर्वोत्तम प्रयत्न करतोय. सध्याची परिस्थिती थोडी वेगळी आहे. मात्र सर्वकाही पूर्ववत झाल्यावर युट्यूबवर मी नियमित व्हिडीओ अपलोड करेन”, असं आश्वासन शोएबने चाहत्यांना दिलं. तरीही व्लॉगिंग कोणत्याही प्रकारे थांबवलं जाणार नाही, असंही त्याने स्पष्ट केलं आहे. शोएबच्या या व्हिडीओला आतापर्यंत दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

दीपिका आणि शोएब हे ‘ससुराल सिमर का’ या मालिकेच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. दीपिकाचं हे दुसरं लग्न असून तिने लग्नाच्या वेळी धर्मांतर केल्याचंही म्हटलं जातं. शोएबशी लग्नानंतर तिने अभिनयातून ब्रेक घेतला आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा