14 तासांच्या सर्जरीनंतर कशी आहे दीपिकाची प्रकृती? महत्त्वपूर्ण अपडेट समोर
अभिनेत्री दीपिका कक्करवर गुरुवारी मोठी सर्जरी करण्यात आली. ही सर्जरी जवळपास 14 तास सुरू होती. त्यानंतर तिच्या प्रकृतीविषयीची अपडेट पती शोएब इब्राहिमने दिली आहे. दीपिकाच्या प्रकृतीविषयी चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करवर गुरुवारी मोठी शस्त्रक्रिया पार पडली. काही दिवसांपूर्वी तिला स्टेज 2 लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यासाठी तिच्यावर तब्बल 14 तास सर्जरी करण्यात आली. आता सर्जरीनंतर तिच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते प्रतीक्षा करत आहेत. अशातच दीपिकाचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिमने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. दीपिकावरील सर्जरी व्यवस्थित झाली असून तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचं शोएबने सांगितलं. सर्जरीनंतर दीपिका आयसीयूमध्येच आहे. दीपिकावर सर्जरी होण्यापूर्वी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने तिच्याशी संपर्क साधला होता. तिच्या आवाजावरून ती खूप हैराण झाल्याचं मला समजलं होतं, असं तेजस्वी म्हणाली.
“कॅन्सरबद्दलची पोस्ट ती शेअर करण्यापूर्वी आमचं फोनवरून बोलणं झालं होतं. मला ती खूप चिंताग्रस्त वाटत होती. मला तिच्या प्रकृतीविषयी खूप काळजी आहे. सुदैवाने योग्य वेळी निदान झालं आणि तिच्यावरील सर्जरीसुद्धा व्यवस्थित पार पडल्याचं कळतंय. तिच्या प्रकृतीबद्दलची प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची माझीही इच्छा आहे. परंतु मी तिला किंवा तिच्या कुटुंबीयांना सतत त्रास देऊ शकत नाही”, असं तेजस्वी म्हणाली.
View this post on Instagram
10 तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची आयसीयूमध्ये बारकाईने देखरेख करणं आवश्यक असतं. चयापचय, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकणं आणि रक्त गोठण्यात यकृताची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर शरीराला त्या बदलाला सामोरं जाण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यातही वेदना किती होतायत, संसर्ग रोखणं आणि यकृताचं कार्य स्थिर करणं या महत्त्वपूर्ण गोष्टी असतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.
कॅन्सरचं निदान झाल्यानंतर शोएब आणि दीपिकाने त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्लॉग पोस्ट केला होता. त्यामध्ये ती म्हणाली होती, “कॅन्सर हा शब्द प्रत्येकासाठी खूप भीतीदायक, घाबरवणारा असतो. हा आजार मानसिकदृष्ट्या खूप घाबरवतो. परंतु डॉक्टरांनी सांगितलं आहे की मी पूर्णपणे बरी होऊ शकते. मला गॉल ब्लॅडरमधील स्टोनमुळे पोटात सतत दुखायचं. जेव्हा उपचारांनीही हे दुखणं बरं झालं नाही तेव्हा आम्ही सिटी स्कॅन केलं. त्यात ट्युमर असल्याचं निदान झालं होतं. नंतर समजलं की तो कॅन्सरचा ट्युमर आहे. ही देवाच्या परीक्षेची वेळ आहे, पण यातूनही आम्ही लवकरच बाहेर पडू.”
