Dhanush aishwarya Divorce : अभिनेता धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर चाहत्यांमध्ये नाराजी तर राम गोपाल वर्मा म्हणतात,’घटस्फोटाचा उत्सव साजरा करा!’

Dhanush aishwarya Divorce : अभिनेता धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर चाहत्यांमध्ये नाराजी तर राम गोपाल वर्मा म्हणतात,'घटस्फोटाचा उत्सव साजरा करा!'
राम गोपाल वर्मा, ऐश्वर्या, धनुष

मुंबई : सुपरस्टार द रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या ( rajnikant daughter aishwarya) आणि प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा अभिनेता धनुष  (actor dhanush) यांनी 18 वर्षांच्या सहवासानंतर आता आपण वेगळे होत असल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरलीये. तशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 18, 2022 | 2:03 PM

मुंबई : सुपरस्टार द रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या ( rajnikant daughter aishwarya) आणि प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा अभिनेता धनुष  (actor dhanush) यांनी 18 वर्षांच्या सहवासानंतर आता आपण वेगळे होत असल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरलीये. तशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Director ram gopal varma) यांनी मात्र ‘घटस्फोटाचा उत्सव साजरा करा’, असं ट्विट केलं आहे.

राम गोपाल वर्मा यांचं ट्विट

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी घटस्फोटावर आपलं मत मांडलं आहे. ‘नाचगाण्यासह घटस्फोटाचा उत्सव साजरा केला जावा. कारण घटस्फोटामुळे तुम्ही एका बंधनातून मुक्त होता. एकमेकांच्या दुर्गुणांना पडताळण्यासाठी लग्न केलं पाहिजे.’ लग्नसंस्थेविषयी ते म्हणतात, ‘लग्न ही आपल्या पूर्वजांनी आपल्यावर लादलेली सर्वात वाईट गोष्ट आहे. दु:ख आणि सुखाचं चक्रव्ह्यूव आधिकाधिक वेगवान करण्यासाठी लग्न आपल्यावर लादलं गेलं आहे.’

राम गोपाल वर्मा यांनी या ट्विटमध्ये कुणाच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी नेटकऱ्यांनी मात्र या सगळ्याला ऐश्वर्या आणि धनुषच्या घटस्फोटाशी जोडलं आहे. राम गोपाल वर्मा यांच्या या ट्विटवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. एखाद्या जोडप्याच्या घटस्फोटानंतर आनंद कसा हो शकतो, असं मत काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 18 वर्ष एकत्र राहिल्यानंतर आणि 8 वर्षांच्या संसारानंतर ऐश्वर्या आणि धनुषने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या घटस्फोटावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

संबंधित बातम्या 

Dhanush Aishwarya Divorce : धनुषने ऐश्वर्यापासून वेगळं होताच ऐश्वर्याची बहिण सौंदर्याची काय होती प्रतिक्रिया, जाणून घ्या!

18 वर्षांची मैत्री,  8 वर्षांचा संसार, अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या यांची ‘अशी’ आहे लव्हस्टोरी

धनुषची रजनीकांतच्या लेकीला सोडचिठ्ठी, पण सोशल मीडियावर चर्चा श्रुती हसनची!, पाहा नेमकं कारण काय..?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें