Dhanush Aishwarya Divorce : धनुषने ऐश्वर्यापासून वेगळं होताच ऐश्वर्याची बहिण सौंदर्याची काय होती प्रतिक्रिया, जाणून घ्या!

Dhanush Aishwarya Divorce : धनुषने ऐश्वर्यापासून वेगळं होताच ऐश्वर्याची बहिण सौंदर्याची काय होती प्रतिक्रिया, जाणून घ्या!
सौंदर्या रजनीकांतने शेअर केला फोटो

लग्नाच्या 18 वर्षानंतर धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत (Dhanush Aishwarya) यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. काल रात्री म्हणजेच 17 जानेवारी रोजी या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर (Social media) करत लोकांना याबद्दल माहीती दिली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 18, 2022 | 1:32 PM

मुंबई : लग्नाच्या 18 वर्षानंतर धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत (Dhanush Aishwarya) यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. काल रात्री म्हणजेच 17 जानेवारी रोजी या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर (Social media) करत लोकांना याबद्दल माहीती दिली. मात्र, ते इतक्यावरच थांबले नाहीतर त्यांनी आमच्या निर्णयाचा आदर करा असे आवाहन लोकांना केले आहे. धनुष आणि ऐश्वर्याच्या विभक्त झाल्याची बातमी आल्यानंतर काही तासांनी रजनीकांत यांची छोटी मुलगी आणि ऐश्वर्याची बहीण सौंदर्या रजनीकांतने तिच्या ट्विटर हँडलचा फोटो बदलला आहे.

ऐश्वर्या ही साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुष आणि ऐश्वर्या 2004 मध्ये लग्नबंधणात अडकले होते. धनुष आणि ऐश्वर्या यांना यात्रा आणि लिंगा असे दोन आपत्य देखील आहेत. या अगोदरही अनेक वेळा धनुष आणि ऐश्वर्या विभक्त होणार अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. धनुष दिग्दर्शक, निर्माता, गायक, गीतकार आणि लेखक देखील आहे. धनुष केवळ दक्षिणेतच नाही तर बॉलिवूडमध्येही खूप प्रसिद्ध आहे. नुकताच धनुषने सारा अली खानसोबत अतरंगी रेमध्ये काम केले आहे.

ऐश्वर्याने केली सोशल मीडियावर पोस्ट

इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना ऐश्वर्याने लिहिले की, “कोणत्याही कॅप्शनची गरज नाही, फक्त तुमचे प्रेम आणि समर्थन हवे आहे. ऐश्वर्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “18 वर्षसोबत राहिलो, मैत्री, कपल, पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक, समजूतदारपणा हे सर्व सोबत केले. आज आपण तिथे उभे आहोत जिथे आपले मार्ग वेगळे होत आहेत. धनुष आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांपासून दूर राहून स्वतःला चांगले ओळखू. कृपया आम्ही घेतलेल्या निर्णयाचा आदर करा आणि आमची प्राइवेंसी लक्षात घेऊन आम्हाला हे सर्व हाताळू द्या.

संबंधित बातम्या : 

Dhanush Aishwarya Divorce : अभिनेता धनुषचा रजनीकांतच्या मुलीला घटस्फोट; 18 वर्षानंतर दोघांचाही वेगळं होण्याचा निर्णय

raj kundra case: अभिनेत्री पूनम पांडेला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयात घेतली होती धाव


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें