
Disha Patani House Firing: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या बरेली येथील घरावर गोळीबार करण्यात आलेला आहे. गोळीबारानंतर परिसरात धक्कादायक वातावरण आहे. घटनेनंतर दिशाच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. गोळीबाराची बातमी समोर आल्यानंतर दिशाच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. यामध्ये कोणा जखमी झालेलं नाही. पण समोर येत असलेल्या माहितीनुसार घटनेची जबाबदारी रोहित गोदरा आणि गोल्डी ब्रार टोळीने स्वीकारली आहे… सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिशाच्या बरेली येथील घरात आई – वडील आणि बहीण खुशबू राहते. घटनेनंतर दिशाच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. घराबाहेर विविध ठिकाणी गोळीबाराचे निशाण स्पष्टपणे दिसत आहेत. रोहित गोदरा आणि गोल्डी ब्रार यांनी संत प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्यावरील खुशबूच्या टिप्पणीला यामागील कारण सांगितलं..
दिशाचं वडिलोपार्जित घर बरेलीच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील व्हिला क्रमांक 40 मध्ये आहे. तिचे वडील आणि निवृत्त डीएसपी जगदीश सिंह पटानी, आई आणि बहीण माजी मेजर खुशबू पटणी येथे राहतात. गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील लोक घाबरले आणि तेव्हापासून ते सुरक्षिततेसाठी घरात आहेत. दिशाचे शेजारी सचिन यादव आणि इस्रत यांच्या म्हणण्यानुसार, 10 – 12 राउंड गोळीबार करण्यात आला. त्यांनी सांगितल्यानुसार, शेजारच्यांनी आरोपीला अपाचे कारमधून पळून जाताना पाहिले.
काही महिन्यांपूर्ली सोशल मीडियावर आध्यात्मिक नेते आणि धार्मिक वक्ते अनिरुद्धाचार्य महाराज यांनी मुलींबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते, ‘मुलींचं लग्न 25 वर्षाच्या आत झालं पाहिजे. लग्न उशिरा झालं की, मुलींचे 4 – 5 बॉयफ्रेंड होतात. त्यामुळे आई – वडिलांनी वेळेत मुलींचं लग्न केलं पाहिजे…’
अनिरुद्धाचार्य महाराज यांच्या वक्तव्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता, खुशबू पटानी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केलेला. ‘जर बाबा माझ्या समोर असते तर त्यांना सांगितलं असतं तोंड मारणं काय असतं… मी या बाबाचं समर्थन करत नाही. मुली लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहतात, तोंड मारतात… त्यांना का नाही बोलत जी मुलं लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहतात? मुली एकट्या लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहतात का? आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं काही पाप आहे का?’ असं देखील खुशबू म्हणाल्या होत्या. ज्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे.