मृत्यूपूर्वी दिव्या भारतीचं धक्कादायक वक्तव्य, ‘माझं होणारं बाळही…’, अनेक वर्षांनंतर सत्य समोर

Divya Bharti: दिव्या भारती हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर, मत्यूपूर्वी अभिनेत्री कोणाली म्हणाली होती, 'माझं होणारं बाळ देखील...', धक्कादायक सत्य समोर..., आज दिव्या भारती जिवंत नसली तरी, अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम असते चर्चेत...

मृत्यूपूर्वी दिव्या भारतीचं धक्कादायक वक्तव्य, माझं होणारं बाळही..., अनेक वर्षांनंतर सत्य समोर
| Updated on: Aug 19, 2024 | 12:36 PM

वयाच्या 19 व्या वर्षी दिव्या भारती हिचं तिच्या फ्लॅटच्या बालकनीतून पडून निधन झालं. तिच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. दिव्या भारती हिच्या निधनला अनेक वर्ष लोटली आहेत, पण अद्यापही कोणीही अभिनेत्रीला विसरु शकलेलं नाही… 5 एप्रिल 1993 रोजी दिव्या भारती हिने अखेरचा श्वास घेतला. पण मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तिच्या बाळाबद्दल मोठं वक्तव्य केलं हेते…. याबद्दल अभिनेत्री सोनम खान हिने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र सोनम खान हिने दिव्या भारती हिच्याबद्दल सांगितलं सत्य चर्चेत आहे.

सांगायचं झालं तर, सोनम खान आजही कायम दिव्या भारती हिचं कौतुक करताना दिसते. सोनमने अनेकदा दिव्याच्या नैसर्गिक सौंदर्याचं आणि स्क्रीन प्रेझेन्सचे कौतुक केलं. दिव्याच्या आयुष्याचा आणि कारकिर्दीचा दुःखद अंत झाल्यानंतर त्याचा बॉलिवूडवर काय फरक पडला याबद्दल सोनम हिने अनेकदा सांगितलं आहे.

दिव्या हिच्या निधनानंतर बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी दिव्या आणि सोनम यांचं फोनवर बोलणं झालं होतं. सोनम एका मुलाखतीत म्हणाली, ‘दिव्या मला म्हणाली होती चंद्र बघ… माझं होणारं बाळ देखील माझ्या सारखं सुंदर असेल…. दिव्या एक अशी अभिनेत्री होती, जिच्यासोबत माझी घट्ट मैत्री होती. आता दिव्या जिथे कुठे असले, तिथे आनंदी असेल… एवढंच सांगू शकते. आणखी तिच्याबद्दल काय बोलणार..’ असं देखील अभिनेत्री सोनम खान म्हणाली.

सोमन खान पुढे म्हणाली, ‘आज दिव्या असती तर, टॉप अभिनेत्रींच्या यादीत अव्वल असती. तिच्यासोबत जे काही झालं, ते फार हृदयद्रावक आहे. असं नव्हतं झालं पाहिजे… पण आता आपण काही करु देखील शकत नाही…’ शिवाय ‘मोहरा’ सिनेमासाठी रवीना टंडन हिच्याआधी दिव्या भारती हिच्या नावाचा विचार करण्यात आला होता. असं देखील सोनम म्हणाली.

दिव्या भारती असती ब्लॉकबस्टर सिनेमाचा भाग…

सोनम खान म्हणाली, शिवाय ‘मोहरा’ सिनेमात रवीना टंडन हिच्या जागी दिव्या भारती झळकली असती. पण तिच्या अचानक निधनामुळे रवीनाची वर्णी लागला. 1994 मध्ये सिनेमात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत होते. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तुफान कमाई केली.

दिव्या भारती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘विश्वात्मा’, ‘शोला और शबनम’ आणि ‘दीवाना’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण जेव्हा अभिनेत्रीचं निधन झाले तेव्हा, दिव्या हिची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा अनेकांनी केला.