‘भ्रष्टाचार करु नका आणि होऊही देऊ नका..’, असं का म्हणाला आकाश ठोसर?

सैराट' फेम अभिनेता आकाश ठोसर याचं भ्रष्टाचारविरोधात मोठं विधान. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा... एवढंच नाही तर, अभिनेत्याने ‘बाल शिवाजी’ सिनेमाबद्दल देखील केलं मोठं वक्तव्य... आकाश लवकरच ‘बाल शिवाजी’ सिनेमाच्या माध्यमातून येणार चाहत्यांच्या भेटीस...

'भ्रष्टाचार करु नका आणि होऊही देऊ नका..', असं का म्हणाला आकाश ठोसर?
Follow us
| Updated on: Nov 05, 2023 | 1:52 PM

मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 : ‘सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोसर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनेता लवकरच ‘बाल शिवाजी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती देखील समोर येत आहे. दरम्यान, आकाश याने भ्रष्टाचारविरोधात लक्षवेधी विधान केलं आहे. सध्या सर्वत्र आकाश ठोसर याची चर्चा रंगली आहे. ‘तुम्ही जागृत राहा, भ्रष्टाचार करु नका आणि होऊही देऊ नका…’ असं म्हणत अभिनेत्याने सर्वत्र होत असलेल्या भ्रष्टाचाराचा विरोध केलं आहे. इंडियन बँकेच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या वॉकेथॉनमध्ये सैराट फेम मराठी अभिनेता आकाश ठोसर सहभागी झाला होता.

वॉकेथॉनमध्ये आकाश याने भ्रष्टाचारविरोधात मोठं विधान केलं आहे. ‘इंडियन बँकेचे आभार की ते भ्रष्टाचारविरोधात बोलत आहेत. अशाच छोट्या-छोट्या पावलांनी सुरुवात होते. यावर आपण बोललं पाहिजे. तुम्ही जागृत राहा, भ्रष्टाचार करु नका आणि होऊही देऊ नका…’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्याने त्याच्या आगामी सिनेमाबद्दल देखील मोठी माहिती दिली आहे. ‘बाल शिवाजी नावाचा माझा नवा सिनेमा येत आहे. महाराजांच्या मोठेपणीच्या लढाया आपण ऐकल्या-वाचल्या आहेत. पण १४-१५ वर्षांच्या शिवरायांचं आयुष्य आम्ही या सिनेमात दाखवतोय. शिवरायांवरचे अनेक सिनेमे आले असतील, पण शिवरायांच्या आयुष्यातील हा टप्पा दाखवलेला नाही, म्हणून मी देखील खूप उत्सुक आहे.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

आकाश सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर अभिनेत्याची चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आकाश याच्या प्रत्येक फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतो. एवढंच नाही तर, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आकाश कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

अभिनेत्याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘सौराट’ सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या आकाश याने ‘झुंड’, ‘एफयू’, ‘घर बंदूक बिरयानी’ सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत. आता चाहते देखील आकाश ठोसर याच्या ‘बाल शिलाजी’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.