Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : कोट्यवधींचा मालक अनुष्का शर्माचा पती, ‘या’ मार्गांनी कमावतो अफाट पैसा

Virat Kohli : भारतीय क्रिकेटपटू आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा पती विराट कोहली गडगंज संपत्तीचा मालक, अनेक मार्गांनी कमावतो कोट्यवधी रुपये... सध्या सर्वत्र विराट कोहली यांच्या संपत्तीची चर्चा... मुंबई याठिकाणी असलेल्या आलिशान घरात कुटुंबासोबत जगतो रॉयल आयुष्य...

Virat Kohli : कोट्यवधींचा मालक अनुष्का शर्माचा पती, 'या' मार्गांनी कमावतो अफाट पैसा
Follow us
| Updated on: Nov 05, 2023 | 12:59 PM

मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली आज 35 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करत आहे. आज देशभरातील त्यांचे चाहते क्रिकेटपटूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. विराट कोहली फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. विराट कोहली याच्या लूकवर देखील असंख्या महिला चाहत्या फिदा आहेत. स्वतःची आवड जोपासत विराट कोहली आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विराट भारतासाठी खेळत आहे. भारताचा लोकप्रिय क्रिकेटपटू विराट कोहली रॉयल आयुष्य जगते. विराट त्याच्या कुटुंबासोबत मुंबई याठिकाणी आलिशान घरात राहतो.

सध्या सर्वत्र अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा पती आणि लोकप्रिय क्रिकेटपटू विराट कोहली याच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे. विराट कोहली अनेक मार्गांनी कोट्यवधी रुपयांची माया कमावतो. विराट कोहली याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, त्याच्याकडे तब्बल 1050 कोटी रुपयांची संपत्ती आहे .

विराट कोहली याने 2008 साली भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत विराट तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर 2017 मध्ये त्याला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. त्यानंतरही तो टीम इंडियासाठी सातत्याने विक्रम रचत आहे.

हे सुद्धा वाचा

बीसीसीआयकडून विराट कोहली याला मिळतात इतके रुपये

बीसीसीआयने विराट कोहली याला कॉन्ट्रॅक्ट यादीत ‘ए प्लस’ श्रेणीत ठेवलं आहे. क्रिकेटपटूला करारानुसार बीसीसीआयकडून वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. याशिवाय BCCI त्याला एक कसोटी खेळण्यासाठी 15 लाख रुपये, एक वनडे खेळण्यासाठी 6 लाख रुपये आणि एक T20 सामना खेळण्यासाठी 3 लाख रुपये देत असल्याची माहिची समोर येत आहे.

जाहिरातींच्या माध्यमातून विराट कमावतो इतके कोटी

विराट कोहली याच्याबद्दल सांगायचं झालं तर, क्रिकेटपटू 8 पेक्षा जास्त ब्रँडसाठी जाहिरातींसाठी काम करतो. विराट प्रत्येक जाहिरातीच्या शूटिंगसाठी वर्षाला 7.50 ते 10 कोटी रुपये मानधन घेतो. एवढंच नाही तर, विराट कोहली याचं मुंबईत आलिशान घर देखील आहे. मुंबई येथील वरळी याठिकाणी विराट याचं भव्य घर आहे. 2016 मध्ये विराट याने हे घर जवळपास 34 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं.

विराट याच्या महागड्या गाड्यांचं कलेक्शन

विराट कोहली याच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विराट याने अनेक महागड्या गाड्या खरेदी केल्या आहेत. विराट याच्याकडे Audi R8 V10 Plus, Audi R8 LMX, Audi A8 L, Audi Q8, Audi S5 सारख्या कारचा समावेश आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.