एकेकाळी हा कार्यक्रम सुरु होताच लोकं टीव्ही बंद करायचे; 59 वर्षे चालला अन् बनला नंबर 1

भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात दूरदर्शनने अनेक लोकप्रिय कार्यक्रम प्रेक्षकांसमोर आणले. रामायण, महाभारत आणि शक्तिमान यांसारख्या मालिकांनी प्रेक्षकांना टीव्हीसमोर खिळवून ठेवले होते. मात्र, याच वाहिनीवर प्रसारित होणारा एक कार्यक्रम असा होता, जो सुरू होताच मनोरंजनाच्या शोधात असलेले काही प्रेक्षक टीव्ही बंद करत असत. तरीही गेल्या 59 वर्षांपासून सुरू असलेला हा कार्यक्रम आजही आपल्या वेगळ्या विक्रमामुळे चर्चेत आहे.

एकेकाळी हा कार्यक्रम सुरु होताच लोकं टीव्ही बंद करायचे; 59 वर्षे चालला अन् बनला नंबर 1
krushi dharshan
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 3:25 PM

भारतीय टीव्हीच्या इतिहासात दूरदर्शनने अनेक लोकप्रिय कार्यक्रम प्रेक्षकांसमोर आणले. रामायण, महाभारत आणि शक्तिमान यांसारख्या मालिकांनी प्रेक्षकांना टीव्हीसमोर खिळवून ठेवले होते. मात्र, याच वाहिनीवर प्रसारित होणारा एक कार्यक्रम असा होता, जो सुरू होताच मनोरंजनाच्या शोधात असलेले काही प्रेक्षक टीव्ही बंद करत असल्याचं सांगितलं जातं. तरीही 59 वर्षांहुन अधिकचा काळ एका मालिकेने गाजवला.
या कार्यक्रमाची सुरुवात 1967 मध्ये झाली होती. शेती, पिकांचे उत्पादन, आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रातील बदल याबाबतची माहिती यातून दिली जाते. निवेदकांसोबत कृषी तज्ज्ञही सहभागी होऊन शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित विविध विषयांची माहिती देतात.

दूरदर्शनवरील काही मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या तुलनेत याचा विषय पूर्णपणे वेगळा होता. त्यामुळे मनोरंजनासाठी टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांना त्यात फारसा रस नसे. मात्र, शेतकरी वर्गासाठी हा कार्यक्रम माहितीचा महत्त्वाचा स्रोत ठरला. शेतीतील नवीन पद्धती, तंत्रज्ञान आणि उत्पादनाशी संबंधित माहिती मिळत असल्याने ग्रामीण भागातील प्रेक्षकांमध्ये त्याचे महत्त्व कायम राहिले.

Loading...

या कार्यक्रमाने एपिसोडच्या संख्येतही मोठा टप्पा गाठला आहे. आतापर्यंत 16 हजारांहून अधिक एपिसोड प्रसारित झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात त्याची स्वतंत्र नोंद झाली आहे.

मनोरंजनापेक्षा माहिती आणि शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या या कार्यक्रमाने अनेक दशकांचा प्रवास पूर्ण केला आहे. बदलत्या काळानुसार शेतीतील आधुनिकता तंत्रज्ञान, पिकांची निगा आणि कृषी क्षेत्रातील नव्या घडामोडी यांची माहिती देण्याचे कामही सुरू राहिले. त्यामुळे दीर्घकाळ प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्याचे नाव आजही आवर्जून घेतले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us