AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit : माधुरीशी लग्न ठरलं, पण डॉ. नेनेंना बॉलिवूडच्या स्टार्सची नावंही माहीत नव्हती ! फक्त एका अभिनेत्याला पाहून होते खूश!

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी बॉलिवूडबद्दल आणि तिच्या लोकप्रियतेबद्दलच्या त्यांच्या अज्ञानाचा खुलासा केला. लग्नापूर्वी त्यांना माधुरी किती मोठी स्टार आहे, याची कल्पना नव्हती. फराह खानच्या व्लॉगमध्ये त्यांनी सांगितले की, रिसेप्शनला आलेल्या शाहरुख आणि सलमानसारख्या अनेक मोठ्या अभिनेत्यांना ते ओळखत नव्हते, .

Madhuri Dixit : माधुरीशी लग्न ठरलं, पण डॉ. नेनेंना बॉलिवूडच्या स्टार्सची नावंही माहीत नव्हती ! फक्त एका अभिनेत्याला पाहून होते खूश!
| Updated on: Oct 13, 2026 | 7:12 PM
Share

फिल्म इंडस्ट्रीत एकामागोमाग एक हिट चित्रपट दिलयावर, करिअरच्या अगदी पीक वर असतानाच, बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितने लाखो चाहत्यांचा हृदयभंग करत, अमेरिकीतेल डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्नगाठ बांधली. फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत नसलेल्या व्यक्तीशी विवाह करून माधुरू सरळ अमेरिकेला निघून गेली आणि तिथे अनेक वर्षं ती साधं आयुष्य जगत होती. मात्र लग्नापूर्वीच, माधुरीच लग्न हा प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. अमेरिकेत लहानाचे मोठे झालेले डॉ. श्रीराम नेने, त्यांना माधुरीचं काम, तिची लोकप्रियता याबद्दल फारशी माहिती नव्हती. एवढंच नव्हे तर इंडस्ट्रीतला एक अभिनेता सोडला, तर त्यांना शाहरुख, आमिर, सलमान यांचीही नावंही माहीत नव्हती.

या गोष्टीचा खुलासा खुद्द डॉ नेने यांनीच केला, तो फराह खानच्या व्लॉगमध्ये. आज जेवढी काही माहिती आहे, त्या तुलनेत मला तेव्हा फिल्म इंडस्ट्रीची फारशी काही माहिती नव्हती, त्यामुळेच आमच्या रिसेप्शनला आलेल्या अनेक अभिनेत्यांना मी ओळखूच शकलो नाही, असा किस्सा डॉ. नेनेंनी सांगितला. पण असं असलं तरी फक्त एका अभिनेत्याला ते ओळखत होते, ते म्हणजे बॉलिवूडचे महनायक – अर्थात अमिताभ बच्चन .

शाहरुख-सलमानला ओळखलंच नाही

एका खासगी समारंभात आमचं लगन् झावं, मात्र त्यानंतर एक मोठ्ठं रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं, त्यावेळी माधुरीचे अनेक सहकलाकार आणि इंडस्ट्रीतील अनेक मित्र या रिसेप्शनला आले, असं श्रीराम नेने म्हणाले. मात्र त्याीपैकी बहुतांश लोकांना डॉ. नेने ओळखतच नव्हते. ते म्हणाले,’ मी कोणालाचा ओळखत नव्हतो. असं वाटतं होतं की एखाद्या शाळेच्या प्रॉम किंग प्रमाणे सगळे तुम्हाला भेटतायच, हस्तांदोलन करून शेकहँड करतायत आणि त्यानंतर जेव्हा लग्नाचे फोटो पाहिले तेव्हा मी अनेकांना ओळखायचा प्रयत्न करत होते, कारण जास्त कोणाला मी ओळखतच नव्हतो’ असं ते म्हणाले.

पुढे डॉ. नेने यांनी सांगितलं की, मला फक्त अमिताभ बच्चन हे माहीत होते, कारण मी त्यांचा ‘अमर अकबर अँथनी’ हाँ चित्रपट पाहिला होता. पुढे त्यांनी शाहरुख, सलमानचं कौतुक करत म्हटल की, (मी ओळखत नव्हतो) तरी ते खूप प्रेमाने भेटले आणि नीट वागले.

माधुरीच्या लोकप्रियतेची नव्हती कल्पना

डॉ. श्रीराम नेने हे आधी फार हिंदी चित्रपट बघत नव्हते, लॉस एँजिलिसमध्ये ते मराठी बोलायचे. माधुरीशी लग्न ठरलं, तेव्हा ती किती मोठी स्टार आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. माधुरी आणि डॉ. नेने यांचं लग्न 1999 साली झालं. दोघांना दोन मुलं आहेत. लग्नानंतर हे जोडपं सुमारे 10 वर्षं अमेरिकेत राहिलं आणि त्यानंतर ते भारतात परतले. लग्न झाल्यावर काही काळ माधुरी चित्रपटांपासून दूर होती, नंतर मात्र तिने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. ती मोठा पडदा तसेच टीव्हीवरही खूप ॲक्टिव्ह असते.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा