
हिंदी चित्रपटसृष्टीत अशी एक अभिनेत्री आहे जिच्या एका स्माईलसाठी देखील तिचे चाहते वेडे आहेत. तिने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित. माधुरीचे आजही प्रचंड चाहते आहेत. तिने तिच्या अभिनयाने, आणि नृत्य कौशल्याने अनेकांची मने जिंकली आहेत. डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यानंतर, ती काही काळासाठी बॉलिवूडपासून दूर गेली होती पण तरीही तिचे चाहते मात्र तिला कधीही विसरले नाही. उलट बॉलिवूडमध्ये तिच्या कमबॅकची वाट पाहत होते. माधुरी आणि श्रीराम नेने यांच्या जोडीला देखील तेवढीच पसंती मिळते.
माधुरी दीक्षितची एकूण संपत्ती किती आहे?
बॉलिवूडची धक-धक गर्ल 90 च्या दशकापासून इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यासोबतच ती अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणूनही दिसली आहे. माधुरी ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे आणि तिचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे.
माधुरीची एकूण संपत्ती किती आहे?
माधुरी दीक्षितच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, रिपोर्ट्सनुसार, माधुरीची एकूण संपत्ती 250 कोटी रुपये आहे. अभिनेत्री एका चित्रपटासाठी 4 ते 5 कोटी रुपये घेते आणि रिअॅलिटी शोचे परीक्षण करण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंत शुल्क आकारते. माधुरी दीक्षित मुंबईतील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. तिचे अपार्टमेंट 5,500 चौरस फूट आहे. येथे ती तिची मुले, अरिन आणि रायन आणि पती श्रीराम नेने यांच्यासोबत राहते.
डॉ. श्रीराम नेने महिन्याला किती कमावतात? आणि त्यांची संपत्ती किती?
जर आपण माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्याबद्दल बोललो तर श्रीराम माधव नेने हे कॅलिफोर्नियामध्ये जन्मलेले आहेत. तसेच ते हृदयरोगतज्ज्ञ आहेत. अमेरिकेत यशस्वी हृदयरोगतज्ज्ञ म्हणून नाव कमावल्यानंतर त्यांनी भारतातील डिजिटल आरोग्यसेवा क्षेत्रात प्रवेश केला आणि पाथफाइंडर हेल्थ सायन्सेस कंपनी सुरू केली. श्रीराम नेने यांना लक्झरी कारचीही खूप आवड आहे. त्यांच्याकडे अनेक गाड्यांचा संग्रह आहे. डॉ. श्रीराम नेने यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, रिपोर्ट्सनुसार, श्रीराम नेने हे सुमारे 100 कोटींचे मालक आहेत.एका वृत्तानुसार, श्रीराम नेने महिन्याला 7 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतात.
दोघांपैकी कोणाकडे सर्वात जास्त संपत्ती?
माधुरी दीक्षित आणि त्यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, माधुरीकडे त्यांच्या पतीपेक्षा जास्त पैसे आहेत. जर दोघांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर त्यांची एकूण संपत्ती ही 350 कोटींपेक्षा नक्कीच जास्त आहे. दरम्यान माधुरी आणि डॉक्टर नेने यांच्याकडे परफेक्ट कपल म्हणून नेहमीच पाहिलं जातं. 17 ऑक्टोबर 1999 रोजी दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये काही जवळच्या लोकांमध्येच त्यांचा लग्न सोहळा पार पडला. तेव्हापासून ते आजपर्यंत ही जोडी चाहत्यांची ही फेव्हरेट राहिली आहे.