अजय देवगणसोबत लिफ्टमध्ये घडली होती ‘ही’ घटना; तेव्हापासून पायऱ्यांचाच करतो वापर

ॲक्शन हिरो अजय देवगणला वाटते लिफ्टची भिती; सांगितला 'तो' भयानक किस्सा

अजय देवगणसोबत लिफ्टमध्ये घडली होती 'ही' घटना; तेव्हापासून पायऱ्यांचाच करतो वापर
Ajay DevgnImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 28, 2022 | 12:03 PM

मुंबई: अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळतोय. 2022 हे वर्ष अजयसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलंय. कारण या वर्षभरात त्याने सहा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यापैकी पाच चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. ऑनस्क्रीन पॉवरफुल अभिनयकौशल्य दाखवणारा अजय खऱ्या आयुष्यात मात्र एका गोष्टीला खूप घाबरतो. ती गोष्ट म्हणजे लिफ्ट.

बहुतांश चित्रपटांमध्ये अजयला बिनधास्त आणि निडर भूमिकेत दाखवलं गेलं. मात्र खऱ्या आयुष्यात अजयला लिफ्टमध्ये चढण्यास भिती वाटते. बंद जागेत अडकण्याची भिती कायम त्याच्या मनात असते. या भीतीमागचा किस्सा खुद्द अजयनेच एका शोमध्ये सांगितला आहे.

हे सुद्धा वाचा

‘दृश्यम’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अजयने तब्बसोबत ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. याच शोदरम्यान त्याने लिफ्टसंदर्भात मनात असलेली भीती बोलून दाखवली. त्याचप्रमाणे कधीच लिफ्टमध्ये जात नसल्याचंही त्याने सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

“मी एकदा लिफ्टमध्ये असताना ती तिसऱ्या-चौथ्या मजल्यावरून बेसमेंटला कोसळली होती. जवळपास दीड तासापेक्षा जास्त काळासाठी आम्ही त्यात अडकलो होतो. तेव्हापासून मला लिफ्टमध्ये चढण्यास भिती वाटतो. त्यामुळे मी कोणत्याही मजल्यावर पायऱ्या चढूनच जातो”, असं अजय म्हणाला.

अजय लवकरच ‘भोला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कैथी’ या तमिळ सुपरहिट चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. यामध्ये अजयसोबत तब्बू आणि आमला पॉल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दिग्दर्शक म्हणून अजयचा हा चौथा चित्रपट आहे. याआधी त्याने यू मी और हम, शिवाय आणि रनवे 34 या तीन चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.