AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3 box office collection: विजय साळगावकर थांबायचं नावच घेईना! रविवारी घातला धुमाकूळ

Drishyam 3 box office collection: अजय देवगनच्या चित्रपट ‘दृश्यम ३’ ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली आहे. चित्रपटाने २८५ कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे. चित्रपटाची कथा खूपच कौतुकास्पद ठरली आहे. चला जाणून घेऊया रविवारी चित्रपटाने किती कमाई केली आहे.

Drishyam 3 box office collection: विजय साळगावकर थांबायचं नावच घेईना! रविवारी घातला धुमाकूळ
Drishyam 3Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 8:15 AM
Share

2 आणि 3 ऑक्टोबरचा उल्लेख आला की अनेकांना विजय साळगावकर आणि दृश्यम या चित्रपटाची आठवण येते. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सॅकनिल्कच्या मते, चित्रपटाने ११ ऑक्टोबर म्हणजे रविवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत २०.८० कोटी रुपये कलेक्शन केले. चित्रपटाला ३० टक्के ऑक्युपंसी मिळाली आणि १४,२०३ शोज मिळाले. ‘दृश्यम ३’ ने शनिवारी धमाकेदार कलेक्शन केले. चला जाणून घेऊया चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शसबद्दल…

‘दृश्यम ३’ डे वाइज कलेक्शन

चित्रपटाने पहिल्या दिवशी ६२ कोटींचा व्यवसाय केला होता.

दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ५३.५० कोटी कमावले.

तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ६१ कोटींचा व्यवसाय केला.

चौथ्या दिवशी चित्रपटाने २१ कोटी कमावले.

पाचव्या दिवशी चित्रपटाने १९.५० कोटींचा व्यवसाय केला.

सहाव्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन १५.५० कोटी राहिले.

सातव्या दिवशी चित्रपटाने १३ कोटींचा व्यवसाय केला.

पहिले आठवड्यात चित्रपटाने २४५.५० कोटी कमावले.

आठव्या दिवशी चित्रपटाने १४.५० कोटींचा व्यवसाय केला.

दृश्यम 3 चित्रपटाविषयी

चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक पाठकने केले आहे. अजय देवगन मुख्य भूमिकेत आहे. तो विजय सळगावकरच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटात इशिता दत्ता अजयची मुलगी म्हणून दिसत आहे आणि श्रेया सरन पत्नीची भूमिका निभावत आहे. तसेच तब्बू आणि जयदीप अहलावत यांसारखे कलाकार चित्रपटाचा भाग आहेत. चित्रपटाची कथा जबरदस्त आहे आणि पॉझिटिव्ह वर्ड ऑफ माउथचाही चित्रपटाला फायदा झाला.

यापूर्वी ‘दृश्यम’चे दोन भाग आले आहेत. पहिला भाग निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपट २०१५ मध्ये रिलीज झाला होता आणि खूप आवडला होता. तर चित्रपटाचा दुसरा भाग २०२२ मध्ये रिलीज झाला. दुसऱ्या भागालाही अभिषेक पाठक यांनी दिग्दर्शित केला आणि त्याचेही खूप कौतुक झाले. आता चित्रपटाचा तिसरा भाग बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालत आहे. हा चित्रपट अजयच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Follow Us
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय