Love Life: ‘या’ गडगंज श्रीमंत व्यक्तीमुळे वयाच्या 54 वर्षीही तब्बू एकटीच, दत्तक मुलाबद्दल मोठं वक्तव्य

Love Life: अभिनेत्री तब्बू हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सध्या अभिनेत्री 'दृश्यम 3' सिनेमामुळे चर्चेत आहे. तब्बू तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. दरम्यान, एका मुलाखतीत अभिनेत्रीने लग्न आणि दत्तक मुलाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.

Love Life: या गडगंज श्रीमंत व्यक्तीमुळे वयाच्या 54 वर्षीही तब्बू एकटीच, दत्तक मुलाबद्दल मोठं वक्तव्य
| Updated on: Oct 02, 2026 | 2:31 PM

Love Life: अभिनेत्री तब्बू आता ‘दृश्यम 3’ सिनेमामुळे चर्चेत आहे. तब्बू हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. तब्बू बॉलिवूडमध्ये तर उच्च शिखरावर पोहचली, पण खासगी आयुष्यात अभिनेत्रीने अनेक समस्यांचा सामना केला. तब्बू हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं, पण कोणासोबतच तिचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. एवढंच नाही तर, अभिनेत्रीला लग्न झालं नसलं तरी, दत्तक मुल घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आलेला. सांगायचं झालं तर, झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न केलं नाही, पण मुल दत्तक घेवून मातृत्वाचा आनंद घेतला. पण तब्बूचा फक्त लग्नासाठीच नाही तर मातृत्वाला देखील नकार होता. यामागचं कारण खुद्द तब्बूने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

एका मुलाखतीत तब्बू हिने दत्तक मुलांबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं. अभिनेत्री म्हणाली, ‘मूल दत्तक घ्यायचं असतं तर कधीच घेतलं असतं. पण त्याला आई – वडील दोघांचं प्रेम मिळणार नसेल तर काय फायदा…’ अभिनेत्रीच्या उत्तराने चाहते हैराण झाले.

Loading...

कोणामुळे तब्बू आजही अविवाहित?

तब्बू हिच्या नावाची चर्चा प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत रंगली. ज्यामध्ये अभिनेता संजय कपूर आणि साजिद नाडियाडवाला यांचा समावेश होता. पण दोघांसोबत देखील अभिनेत्रीचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तब्बू हिच्या आयुष्यात प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन याची एन्ट्री झाली. दोघे लग्न करणार अशा चर्चांनी देखील जोर धरलेला. पण तसं काहीही झालं नाही.

प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन याच्यासोबत तब्बूचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले. समोर आलेल्या माहितीनुसा, दोघांनी एकमेकांना तब्बल 10 वर्ष डेट केलं. पण तेव्हा नागार्जुन विवाहित असल्यामुळे तब्बूसोबत अभिनेत्याचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. अखेर 10 वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अक्किनेनी नागार्जुन आणि तब्बू यांची ओळख अभिनेत्री 16 आणि अभिनेता 22 वर्षांचा असताना झाली होती. आज अक्किनेनी नागार्जुन त्याच्या आयुष्यात फार पुढे गेला आहे. तब्बू मात्र आजही एकटं आयुष्य जगते. आज तब्बू आणि अक्किनेनी नागार्जुन यांच्या नात्याला अनेक वर्ष झाली पण त्यांच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असते. एवढंच नाही तर, दोघांची मैत्री कायम आहे. आमच्या नात्याला मला कोणतं लेबल द्यायचं नाही… असं देखील तब्बू म्हणालेली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us