AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh-Salman च्या वाढदिवसाचं मोठं सत्य, दारुच्या बाटल्या, महागडे गिफ्ट आणि…, लॅविश पार्ट्यांचं रहस्य काय?

Shah Rukh-Salman : झगमगत्या विश्वात कायम पार्ट्या होत आसतात आणि आता या पर्ट्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. ज्यामुळे सर्वांमध्ये एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे सेलिब्रिटींच्या पार्टीमध्ये नेमकं होतं तरी काय? सेलिब्रिटीच सेलिब्रिटींना काय गिफ्ट देतात… याची चर्चा देखील सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगलेली असते. विशेषतः अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता सलमान […]

Shah Rukh-Salman च्या वाढदिवसाचं मोठं सत्य, दारुच्या बाटल्या, महागडे गिफ्ट आणि...,  लॅविश पार्ट्यांचं रहस्य काय?
| Updated on: Apr 12, 2026 | 8:18 AM
Share

Shah Rukh-Salman : झगमगत्या विश्वात कायम पार्ट्या होत आसतात आणि आता या पर्ट्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. ज्यामुळे सर्वांमध्ये एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे सेलिब्रिटींच्या पार्टीमध्ये नेमकं होतं तरी काय? सेलिब्रिटीच सेलिब्रिटींना काय गिफ्ट देतात… याची चर्चा देखील सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगलेली असते. विशेषतः अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता सलमान खान यांना वाढदिवसाची भेट म्हणून काय दिलं जातं… अशी देखील चर्चा रंगलेली असते. एवढंच नाही तर, त्यांच्या लॅविश पर्ट्यांमध्ये काय काय होतं याची देखील चर्चा रंगलेली असते.

या सर्व प्रश्नांचं उत्तर प्रसिद्धी निर्माती एकता कपूर हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दिलं आहे. तिने सांगितलं की, जेव्हा लोक समान खान, शाहरुख यांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी जातात तेव्हा त्यांनी गिफ्ट म्हणून काय देतात… नुकताच झालेल्या एका मुलाखतीत एकता कपूर हिला सेलिब्रिटींच्या पार्ट्यांबद्दल विचारण्यात आलं.

प्रश्नाचं उत्तर देत एकता म्हणाली, ‘अशा पर्ट्यांमध्ये कोणी गिफ्ट घेऊन जात नाही.. विशेषतः शाहरुख खान – सलमान खान यांच्या वाढदिवसाच्या पार्ट्यांमध्ये… ते मोठे सेलिब्रिटी आहे आणि त्यांना काय गिफ्ट देणार? मी स्वतः कधी वाढदिवसाच्या पार्ट्यांना जात नाही. स्वतःच्या वाढदिवशी मी तिरुपती जाते आणि कोणाला बोलवत देखील नाही… सेलिब्रिटी गिफ्टमध्ये काय देतात हे जाणून घ्यायचं असेल तर, अधिक लोकं फक्त आशीर्वाद देतात.’

इंडस्ट्रीबद्दल लोकांची समज वेगळी आहे – एकता कपूर

एकता कपूर हिने बॉलिवूडच्या लाईफ स्टाईलवर देखील मोठं वक्तव्य केलं. ‘फिल्म इंडस्ट्रीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन फार वेगळा आहे. त्यांना असं वाटतं येथे लोकं एकमेकांना महागडे गिफ्ट देत असतील, खूर दारु पित असतील आणि प्रत्येक वेळी पार्टी करत असतील… पण हे सत्य नाही… फिल्म इंडस्ट्रीपेक्षा बोरिंग काहीच नाही… येथील लोकं सर्वात बोरिंग आहेत.’

एवढंच नाही तर एकता कपूर हिने सेलिब्रिटींच्या रुटीन लाईफबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे… इंडस्ट्रीमध्ये अधिक लोकं रात्री 8 वाजताच झोपतात आणि सकाळी लवकर उठतात. प्रमाणात जेवतात आणि स्वतःच्या फिटनेसकडे अधिक लक्ष देतात… इंडस्ट्री दिसते तेवढी ग्लॅमरस नाही… असं देखील एकता म्हणाली.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत