Sonu Sood | पंजाबचा ‘स्टेट आयकॉन’, अभिनेता सोनू सूदच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

अभिनेता सोनू सूद याचा जन्म पंजाबमध्ये झाला होता. आता त्याच राज्याचे प्रतिनिधित्व करताना तो दिसणार आहे.

Sonu Sood | पंजाबचा ‘स्टेट आयकॉन’, अभिनेता सोनू सूदच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 11:33 AM

मुंबई : निवडणूक आयोगाने बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याची पंजाबच्या ‘स्टेट आयकॉन’ (State Icon) पदी नियुक्ती केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना सोनू सूद म्हणाला की, ‘हा क्षण त्याच्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप अर्थपूर्ण आहे.’ अभिनेता सोनू सूद याचा जन्म पंजाबमध्ये झाला होता. आता त्याच राज्याचे प्रतिनिधित्व करताना तो दिसणार आहे. सोनू सूद पंजाबमध्ये निवडणुकी विषयी जनजागृती करताना दिसणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने सोमवारी (16 नोव्हेंबर) एक पत्र जारी केले (Election commission makes Actor Sonu Sood Punjab state icon).

‘या सन्मानासाठी मी स्वत:ला भाग्यवान मानतो. सर्वांचे आभार! माझा जन्म पंजाबमध्ये झाल्यामुळे ही गोष्ट  भावनिकदृष्ट्या खूप अर्थपूर्ण आहे. माझ्या राज्याला माझा अभिमान आहे, याचा मला आनंद आहे. यातून मला आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे’, असे सोनू सूद म्हणाला.

संयुक्त राष्ट्रसंघाकडून सन्मान

कोरोना महामारीच्या काळात अभिनेता सोनू सूदने स्थलांतरित मजुरांसह तळागाळातील लोकांची मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले. सोनू सूदच्या या कार्याची दखल आता संयुक्त राष्ट्र संघाने घेतली आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या (UNDP) विशेष ह्युमनटेरियन पुरस्काराने सोनू सूदला सन्मानित करण्यात आले होते.

बॉलिवूड विश्वात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सोनू सूदने खऱ्या आयुष्यात मात्र नायकाची भूमिका बजावली आहे. कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला धावून आलेल्या सोनूने सगळ्याच गरजवंतांची वेळोवेळी मदत केली. स्थलांतरितांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्यापासून सुरू झालेला त्याचा हा मदतीचा ओघ आता बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे (Election commission makes Actor Sonu Sood Punjab state icon).

परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठीही सोनू ठरला देवदूत

देशाच्या वेगवेगळ्या भागात अडकलेली मजुरांना, प्रवाशांना सोनूने रेल्वे आणि बसच्या माध्यमातून त्यांच्या घरी सुखरूप पोहचवले. त्याचवेळी देशाबाहेर अडकलेल्या विद्यार्थांची भारतात येण्याची सोयही त्याने स्वःखर्चातून केली आहे. या विद्यार्थ्यांना भारतात परतण्यासाठी त्याने थेट विमानांची सोय केली.

इतक्यावरच त्याचे मदत कार्य थांबले नसून, खेडोपाड्यात राहणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, इतर वैद्यकीय मदत करण्यासाठीदेखील सोनू सूदने पुढाकार घेतला आहे. गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी त्याने शिष्यवृत्तीदेखील जाहीर केली आहे (Election commission makes Actor Sonu Sood Punjab state icon).

लॉकडाऊनच्या अनुभवावर पुस्तक

लॉकडाऊनमध्ये घडलेल्या घटनांवर सोनू सूदने एक पुस्तक लिहिल्याचे कळते आहे. त्याच्या या पुस्तकाचे नाव ‘आय अॅम नो मसीहा’ असे असणार आहे. डिसेंबरमध्ये हे पुस्तक चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सध्या सोनू सूद ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

(Election commission makes Actor Sonu Sood Punjab state icon)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.