AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सापाच्या विषाच्या पार्टी प्रकरणात थेट सलमान खान याचे कनेक्शन? एल्विश यादव याच्या पोस्टने मोठी खळबळ

एल्विश यादव हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. एल्विश यादव याच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले आहेत. एल्विश यादव याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय.

सापाच्या विषाच्या पार्टी प्रकरणात थेट सलमान खान याचे कनेक्शन? एल्विश यादव याच्या पोस्टने मोठी खळबळ
| Updated on: Nov 12, 2023 | 8:31 AM
Share

मुंबई : बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव हा सध्या तूफान चर्चेत आहे. एल्विश यादव याच्यावर काही दिवसांपुर्वीच अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले. एल्विश यादव हा मोठ्या वादात सापडलाय. थेट एल्विश यादव याच्यावर गुन्हा देखील दाखल  झालाय. हे सर्व सुरू असतानाच थेट एल्विश यादव याने सलमान खान याच्यासोबतचा एक फोटो शेअर केलाय. विशेष म्हणजे हा फोटो बिग बाॅसच्या मंचावरील आहे. हा फोटो शेअर करत एल्विश यादव याने एक अत्यंत खास असे कॅप्शन सोशल मीडियावर शेअर केले आहे.

एल्विश यादव याचे नाव थेट सापांच्या विषाच्या पार्टीमध्ये आल्याने सर्वजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले. एल्विश यादव याच्याकडून सापाच्या विषाच्या पार्टीचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले गेले. इतकेच नाही तर त्याच्या पार्टीमध्ये काही साप देखील जप्त करण्यात आले. या पार्टीमध्ये सापाच्या विषाची नशा केली जात असत.

एल्विश यादव याला पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली. एल्विश यादव याने चाैकशीमध्ये काही मोठे खुलासे देखील केले आहेत. एल्विश यादव याने मुंबईमध्ये देखील सापाच्या विषाच्या पार्टीचे आयोजन केले का यावर पोलिस हे तपास करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये बाॅलिवूडची एक गुप्त पार्टी झाल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

एल्विश यादव याच्या संपर्कात काही बाॅलिवूड स्टार असल्याचे देखील सांगितले जातंय. सलमान खान याच्यासोबतचा फोटो शेअर करत एल्विश यादव याने लिहिले की, काळ हा विचित्र गोष्ट आहे, त्याच्याशी जुळवून घेणे, तू सुद्धा खूप जवळ होतास, आता खूप काही बदलले नक्कीच आहे. एल्विश यादव याला नेमके काय म्हणायचे हे कळू शकले नाहीये. मात्र, त्याने सलमान खान याच्यासोबत फोटो शेअर केल्याने विविध चर्चा रंगत आहेत.

एल्विश यादव याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. एल्विश यादव हा कायमच सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना एल्विश यादव हा दिसतो. एल्विश यादव याने काही दिवसापूर्वी थेट दुबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. दिल्लीमध्येही त्याचे आलिशान घर आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?