Top 5 News | ट्विटरवर ट्रेंड झाला #BoycottRadhikaApte, ते ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर सयाजी शिंदे आणि मनोज बाजपेयी, वाचा मनोरंजन विश्वातील घडमोडी

मनोरंजन विश्वातील बातम्यांच्या दृष्टीनेही  शुक्रवार खूप महत्त्वाचा होता. मात्र, जर तुम्ही शुक्रवार म्हणजेच 14 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

Top 5 News | ट्विटरवर ट्रेंड झाला #BoycottRadhikaApte, ते ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर सयाजी शिंदे आणि मनोज बाजपेयी, वाचा मनोरंजन विश्वातील घडमोडी
Top 5 news
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 10:35 AM

मुंबई : दररोज मनोरंजन विश्वात काही छोट्या-मोठ्या बातम्या चर्चेत असतातच. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सशी संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. मनोरंजन विश्वातील बातम्यांच्या दृष्टीनेही  शुक्रवार खूप महत्त्वाचा होता. मात्र, जर तुम्ही शुक्रवार म्हणजेच 14 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

चित्रपटातील ‘तो’ न्यूड सीन पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल, ट्विटरवर ट्रेंड होतंय #BoycottRadhikaApte

लीना यादव दिग्दर्शित ‘पार्चेड’ (Parched) चित्रपटातील राधिका अपटे हिचा न्यूड सीनचा फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. या चित्रपटात राधिका आपटेसोबत अभिनेता आदिल हुसैन मुख्य भूमिकेत दिसला होता. या दोघांदरम्यान एक न्यूड सीन चित्रित झाला होता. अभिनेत्री राधिका आपटे हिचा हा चित्रपट 2016मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील राधिका आपटेचा हा सीन आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या न्यूड सीन फोटोवर नेटकरी संतापले आहेत. नेटकऱ्यांनी या सीनवर आक्षेप घेत, राधिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर, काहींनी जरा तरी संस्कृती जपा म्हणत तिला बोल लगावण्यास सुरुवात केली आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये हे असले सीन दाखवून देशभरात अश्लीलता पसरवली जात असल्याचे म्हटले जात आहे.

स्वीटूला बघायला पुन्हा एकदा मुलाकडची मंडळी येणार, आता तरी मुलगी पसंत पडणार?

छोट्या पडद्यावर सध्या चर्चेत असलेली ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) ही मालिका देखील आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिका शेवटच्या टप्प्याकडे सरकत असल्याने, मालिकेच्या कथानकाने जोरदार वेग पकडला आहे. आता स्वीटूची आई अर्थात नलू मावशी हिचा स्वीटू आणि ओमच्या नात्याला असलेला विरोध पूर्णपणे मावळला आहे. ओमने आपल्या मुलीच्या आयुष्यात येऊ नये, यासाठी नलूने त्याला अनेक कष्ट करायला लावले. मात्र, कुठल्या परीक्षेला न घाबरता आपल्या प्रेमावर विश्वास ठेऊन ओम नेहमीच जिंकत राहिला. अर्थात त्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळे नलूचा विरोध आता होकारात बदलला आहे. तिने या दोघांच्या नात्याला अखेर परवानगी दिली आहे.

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर सयाजी शिंदे आणि मनोज बाजपेयी सांगणार वृक्ष संवर्धनाचं महत्त्व!

छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या प्रसिद्ध कार्यक्रमाचा मराठी अवतार म्हणजे ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Karodpati). 2019ला या कार्यक्रमाचे पहिले पर्व प्रदर्शित झाल्यावर गेल्यावर्षी कोरोनामुळे या कार्यक्रमाला विश्राम घ्यावा लागला होता. परंतु, आता कोरोना परिसथिती थोडी आटोक्यात आल्यावर आता दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे सूत्रसंचालन ‘सैराट’ फेम नागराज मंजुळे यांनी केले होते व आता दुसऱ्या भागासाठी जेष्ठ अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांची वर्णी लागलीय. मराठी घराघरांत सगळ्यांना सचिन खेडेकर परिचित आहेत. आता या मंचावर ‘कर्मवीर विशेष’ या भागात अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) आणि अभिनेते मनोज जोशी (Manoj Joshi) हजेरी लावणार आहेत.

अखेर रेश्माचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला, वाड्यातील लोकांची पुन्हा चौकशी होणार!

‘देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेत आता देवी सिंग उर्फ डॉ. अजित कुमार देव याचे काळे कारनामे उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे. मालिका आता शेवटच्या टप्प्यावर आली असून, दोन दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. यामुळे आता कथानकाने देखील काहीसा वेग पकडला आहे. आता देवी सिंगचे सगळे गुन्हे एक-एक करून बाहेर पडणार असून, त्याला फाशीची शिक्षा होणार हे नक्की झालं आहे. रूपाच्या संगाड्यानंतर आता वाड्याच्या मागे आणखी एक सांगाडा सापडला आहे. खेळता खेळता खजिना सापडणार म्हणून टोण्याने वाड्यामागची जमीन खणण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्याला एका सांगाड्याचा हात दिसला. यामुळे घाबरलेल्या टोण्याने आरडा ओरड सुरु केली आणि पोलिसांना याची खबर लागली. आता पुन्हा एकदा पोलीस या वाड्यात येऊन सर्वाची चौकशी करणार आहेत.

‘आगिनफुले’ची ‘ठिणगी ठिणगी’ झाली आणि गाण्याने रसिकांची मने जिंकली!

काही जुनी गाणी रसिकांसाठी नेहमीच त्यांच्या हृदयाजवळची असतात. जुन्या गाण्यातील शब्द, त्यांचे भाव आणि त्यातील आपुलकी आजही ऐकणाऱ्याच्या मनाला मोहीत करते. हिंदीच नव्हे तर, कित्येक मराठी गाणी देखील आजही चिरतरुण वाटतात. अशाच एका गाजलेल्या आणि अजरामर गाण्यांपैकी एक आहे ‘साधी माणसं’ या चित्रपटातील ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे’ (Airaneechya Deva Tula) हे गीत…‘साधी माणसं’ या चित्रपटातील, जगदीश खेबुडकर लिखित हे गाणं आहे. चित्रपटाच्या नावाला शोभणारे बोल, त्याला लतादीदींचा आवाज आणि संगीतसरितेचा निखळ प्रवाह, त्याला दिदींनीच ‘आनंदघन’ या नावाने संगीतकार म्हणून स्वतः दिलेले संगीत यातून जे गीत बनलं आहे, ते आपल्या सर्वांच्या मनात अजरामर झालेलं आहे.

हेही वाचा :

बॉस आणि कर्मचाऱ्यांच्या नात्यावर आधारित वेब सीरीज, ब्रूकलिन नाईन-नाईन प्रेक्षकांच्या भेटीला

फ्लॉप चित्रपटांना वैतागून इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय, सलमानने हात दिला नि सावरलं मोहनीशचं करिअर!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.