AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Esha Deol | ‘सर्व काही सांगू शकत नाही कारण…’, सावत्र भावांसोबत असलेल्या नात्याबद्दल ईशा स्पष्टच बोलली

Esha Deol | 'गरद २' सिनेमा दरम्यान देओल कुटुंब एकत्र दिसलं, पण कसं आहे ईशा देओल हिचं सावत्र भाऊ सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत नातं? ईशाच्या वक्तव्यची सर्वत्र चर्चा..

Esha Deol | 'सर्व काही सांगू शकत नाही कारण...', सावत्र भावांसोबत असलेल्या नात्याबद्दल ईशा स्पष्टच बोलली
| Updated on: Sep 13, 2023 | 8:09 AM
Share

मुंबई : 13 सप्टेंबर 2023 | अभिनेते धर्मेंद्र यांचे दोन्ही कुटुंब कायम सर्वत्र चर्चेत असतात. गेल्या दिवसांपासून देओल कुटुंब अभिनेते सनी देओल यांच्या ‘गदर २’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘गदर २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. ‘गदर २’ सिनेमामुळे देओल कुटुंबातील अनेक गोष्टी देखील समोर आल्या. एवढंच नाही तर, धर्मेंद्र यांची चार मुलं एकत्र दिसली. धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल हिने ‘गदर २’ सिनेमाच्या स्क्रिनींगचं आयोजन केलं होतं. सिनेमाच्या स्क्रिनींसाठी धर्मेंद्र यांचं पहिलं कुटुंब देखील उपस्थित होतं. आता नुकताच झालेल्या मुलाखतीत ईशा देओल हिने सावत्र भाऊ सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. अभिनेत्रीच्या वक्तव्यानंतर देओल कुटुंब पुन्हा चर्चेत आलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत ईशा देओल म्हणाली, ‘काही अशा गोष्टी आहेत, ज्याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. कोणीही कितीही समजावलं तरी काही गोष्टींबद्दल मी कधीच बोलणार नाही.’ एवढंच नाही तर, सनी देओल आणि बॉबी देओल यांच्याकडून मिळत असलेल्या प्रेमासाठी अभिनेत्रीने वडील धर्मेंद्र यांचे आभार मानले आहेत…

पुढे ईशा देओल म्हणाली, ‘सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत असलेल्या नात्याची वडिलांपासून झाली आहे. धर्मेंद्र एक उत्तम व्यक्तिमत्व आहेत आणि आम्ही त्यांचे बीज आहोत. म्हणून त्यांच्याकडून मिळालेला वारसा आम्ही पुढे नेत आहोत. लोकांच्या मनात आमच्या वडिलांबद्दल प्रेम आहे. त्यामुळे आम्हाला देखील लोकांचं प्रेम मिळत आहे…’

सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल ईशा देओल म्हणाली, ‘वर्षांपूर्वी सर्वांना वाटयचं आयुष्य सुरळीत राहिल. पण असं काहीही होत नाही. वेळेनुसार सर्व गोष्टी बदलतात आणि बदलेल्या गोष्टींप्रमाणे आपण वागायला हवं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. तर ‘नकारात्मक ऊर्जेपेक्षा आनंद राहायला हवं…’ असं सनी देओल म्हणाले होते.

ईशा देओल हिचं सावत्र भावांसोबत असलेलं नातं कायम चर्चेत असतं. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण आजपर्यंत हेमा मालिनी यांनी पतीच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही.

हेमा मालिनी देखील त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. ज्यामुळे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगलेल्या असतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सनी देओल यांचा मुलगा करण देओल याचं लग्न झालं पण करण याच्या लग्नात हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली उपस्थित नव्हत्या म्हणून सर्वत्र चर्चा रंगल्या होत्या.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना