Esha Deol | ‘आयुष्यात अंधार आलाय पण…’, ईशा देओल घटस्फोटानंतर व्यक्त झालीच

Esha Deol : घटस्फोटानंतर 'तो' फोटो पोस्ट करत ईश देओलने व्यक्त केल्या मनातील भावना; म्हणाली, 'आयुष्यात अंधार आलाय पण...', उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट, दोन मुलींचा एकटी सांभाळ करतेय ईशा देओल.

Esha Deol | आयुष्यात अंधार आलाय पण..., ईशा देओल घटस्फोटानंतर व्यक्त झालीच
| Updated on: Feb 23, 2024 | 9:56 AM

मुंबई | 23 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल हिच्या खासगी आयुष्यात सध्या अनेक चढ-उतार सुरु आहेत. नुकताच ईशा हिचं घटस्फोट झालं आहे. ईशा हिने 12 वर्षांपूर्वी उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत लग्न केलं. भरत आणि ईशा हिला दोन मुली देखील आहेत. पण भरत याने आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पत्नी आणि दोन मुलींना स्वतःपासून विभक्त केलं आहे. घटस्फोटानंतर ईशा दोन्ही मुलींचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करत आहे.

भरत याच्यासोबत लग्न केल्यानंतर ईशा हिने अनेक सुखी संसाराचे स्वप्न पाहिले होते. लग्नानंतर ईशाने बॉलिवूडचा देखील निरोप घेतला आणि संपूर्ण वेळ पती आणि कुटुंबाला दिला. पण घटस्फोटानंतर ईशा हिचे सर्व स्वप्न स्वप्न म्हणून राहिले. घटस्फोटानंतर एक स्टेटमेंट जारी करत भरत आणि ईशा यांनी विभक्त होत असल्याची बातमी चाहत्यांना दिली. ज्यामुळे चाहत्यांनी देखील मोठा धक्का बसला.

 

भरत याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ईशा हिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे. स्वतःचा फोटो पोस्ट करत ईशा म्हणाली, ‘आयुष्यात कितीही अंधार आला तरी देखील काही फरत पडत नाही. कारण एक दिवस सूर्याचा प्रकाश पुन्हा संपूर्ण आयुष्य प्रकाशमय करेल…’ असं ईशा म्हणाली होती. अभिनेत्री पोस्ट चाहत्यांना देखील प्रचंड आवडली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं, ईशा आणि भरत यांच्या घटस्फोटाची अनेक कारणे समोर येत आहे. भरत याचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे ईशा हिने पतीला घटस्फोट दिल्याची माहिती समोर आली. एवढंच नाहीतर, भरत याला एका मुलीसोबत स्पॉट देखील करण्यात आल्याचा दावा एका सोशल मीडिया युजरने केला होता. पण यावर ईशा किंवा भरत यांनी अधिकृत वक्तव्य केलं नाही.

ईशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. ईशा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. म्हणून ईशा हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. गेल्या काही दिवसांपासून ईशी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.