आमिरच्या गर्लफ्रेंडविषयी खुलासा होताच किरण रावने केली पहिली पोस्ट, म्हणाली ‘तू आमच्या आयुष्यातील VVIP पण…’

नुकताच आमिर खानने त्याची गर्लफ्रेंड गौरी असल्याचा खुलासा केला. त्यानंतर आमिरची पत्नी किरण राववे केलेल्या पहिल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आमिरच्या गर्लफ्रेंडविषयी खुलासा होताच किरण रावने केली पहिली पोस्ट, म्हणाली तू आमच्या आयुष्यातील VVIP पण...
Amir Khan And kiran
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Mar 18, 2025 | 12:05 PM

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून अभिनेता आमिर खान ओळखला जातो. आमिर त्याच्या सिनेमांसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सध्या आमिर त्याच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. नुकताच आमिरने त्याचा ६०वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर आमिरने त्याच्या गर्लफ्रेंडबाबात मोठा खुलासा केला. ते ऐकून सर्वजण चकीत झाले. आमिरने हा खुलासा केल्यानंतर त्याची पूर्वपत्नी किरण रावने पहिली पोस्ट काय केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

किरण रावने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आमिर खानचा फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये आमिरसोबत त्याचा लेक देखील दिसत आहे. दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. किरणने हा फोटो आमिरच्या वाढदिवशी शेअर केला होता. याच दिवशी आमिरने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडबाबत खुलासा देखील केला होता. हे फोटो शेअर करत किरणने, ‘आमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या VVIP व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मिठी… हास्यासाठी आणि नेहमीच माझ्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल धन्यवाद… आमचे तुझ्यावर अजूनही प्रचंड प्रेम आहे’ या आशयाची पोस्ट किरणने केली होती.

वाचा: केदार शिंदे कडून ही अपेक्षा नव्हती, फक्त छपरी पोर…; सूरज चव्हाणच्या ‘झापूक झूपूक’चा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

कोण आहे गौरी?

आमिरने ६०वा वाढदिवस साजरा करताना गौरी नावाच्या एका महिलेला डेट करत असल्याचे सांगितले. ती मूळची बंगळूरुची आहे. आमिरने सांगितले की, तो 18 महिन्यांपासून गौरीला डेट करत आहे. याबद्दल सांगताना आमिरने पापाराझींची खिल्लीही उडवली आणि म्हणाला, “हे बघा, मी तुम्हाला काही कळू दिले नाही.”

आमिरची तिसरी गर्लफ्रेंड

आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तासोबत तर दुसरे लग्न किरण रावसोबत केले आहे. मात्र, आमिरने दोघांपासून घटस्फोट घेतला. आता आमिर खान तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. आमिर आणि गौरी दोघेही एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखतात. आता दोघेही लग्न करू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.