AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Faisal Khan: फैजल खानने सांगितला आमिरच्या घरातला ‘तो’ भयानक अनुभव

"आयुष्यात पुन्हा तो अनुभव नकोच"; आमिरच्या धाकट्या भावाची मुलाखत

Faisal Khan: फैजल खानने सांगितला आमिरच्या घरातला 'तो' भयानक अनुभव
Aamir Khan brother Faisal KhanImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Sep 20, 2022 | 1:32 PM
Share

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला (Aamir Khan) यशस्वी अभिनेता मानलं जातं. आमिरच्या कुटुंबीयांविषयी सोशल मीडियावर वेळोवेळी चर्चा होत असते. मात्र त्याचा भाऊ फैजल खानविषयी (Faisal Khan) फारसं काही ऐकायला मिळत नाही. फैजलने ‘मेला’ या चित्रपटात काम केलं होतं. मात्र काही चित्रपटांनंतर तो बॉलिवूडपासून लांबच राहिला. आमिर आणि फैजल यांच्यात बरेच मतभेद असल्याचंही म्हटलं जातं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फैजलने त्याच्या खासगी आयुष्याविषयी काही खुलासे केले आहेत.

बिग बॉस या शोची ऑफर नाकारल्याचंही फैजलने स्पष्ट केलं. “माझा आजचा दिवस खूप चांगला आहे, कारण आज मला दोन ऑफर्स मिळाल्या आहेत. त्यातली एक ऑफर बिग बॉसची होती, पण मी ती नाकारली. आणखी एक ऑफर एका मालिकेसाठी होती. लोक माझ्याबद्दल विचार करत आहेत या गोष्टीनेच मी खूप आनंदी आहे. मी खूश आहे. मला चांगलं काम मिळण्यासाठी प्रार्थना करा”, असं तो म्हणाला.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने बिग बॉसची ऑफर नाकारण्यामागचं कारण सांगितलं. “बिग बॉसमध्ये एकमेकांशी भांडलं जातं, वाद घातले जातात आणि तुम्हाला टास्कसुद्धा दिले जातात. तुमच्या मानसिकतेशी ते खेळतात. मला पुन्हा त्या झोनमध्ये बंदिस्त व्हायचं नाहीये. त्याबदल्यात ते पैसे देतात, पण देवाच्या कृपेने मला तेवढी पैशांची गरज नाही. त्यामुळे मी बंदिस्त का व्हावं, असा प्रश्न मला पडतो. कोणाला बंदिस्त व्हायला आवडतं? सगळ्यांना मुक्त जगायला आवडतं. मला एकदा आमिरच्या घरात बंदिस्त करण्यात आलं होतं. मला पुन्हा तो अनुभव जगायचा नाहीये. मला मुक्त राहायचं आहे.”

2007-08 मध्ये फैजलने त्याच्या कुटुंबीयांविरोधातील कायदेशीर लढाई लढली होती. कोर्टाच्या निर्णयानंतर दिलेल्या मुलाखतीत त्याने स्पष्ट केलं होतं, “मी कधीच आजारी नव्हतो. आतापर्यंत ज्या अफवा पसरवल्या गेल्या त्या सर्व खोट्या आहेत. माझा मोठा भाऊ आमिर खान आणि इतर कुटुंबीयांनी त्या अफवा पसरवल्या आहेत. किंबहुना, माझं अपहरण करण्यात आलं होतं. मला घरात बंदिस्त केलं गेलं, औषधं दिली गेली. मला सामान्य व्यक्तीप्रमाणे जगायचं आहे.”

फैजलने कयामत से कयामत तक, जो जिता वही सिकंदर, मदहोश, मेला, काबू, दुश्मनी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2003 मध्ये त्याने आंधी या मालिकेतही भूमिका साकारली होती.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...