मुंबई: गायिका फाल्गुनी पाठकचा (Falguni Pathak) एक वेगळाच मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या गाण्यांशी प्रत्येकाच्या असंख्य आठवणी जोडलेल्या आहेत. 90 दशकातील श्रोत्यांच्या आयुष्यात फाल्गुनीच्या गाण्यांची एक वेगळीच जागा आहे. अशातच जर तिच्या गाण्याचा रिमेक बनवला गेला आणि तो रिमेक फसला तर चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागणं साहजिकच आहे. प्रसिद्ध गायिका नेहा कक्करसोबत (Neha Kakkar) सध्या असंच काहीसं घडलंय. 90 च्या दशकातील ‘मैने पायल है छनकाई’ या फाल्गुनीच्या सुपरहिट गाण्याचा तिने नुकताच रिमेक बनवला आहे. ‘ओ सजना’ असं या रिमेकचं नाव आहे.