मधूर आवाजासाठी ‘ही’ प्रसिद्ध गायिका पिते ‘स्पर्म कॉकटेल’, ऐकून इंडस्ट्री हादरली

एका प्रसिद्ध गायिकेने तिच्या मधूर आवाजाचे सिक्रेट उघड केले आहे. तिने केलेला खुलासा ऐकून इंडस्ट्री हादरली आहे.

मधूर आवाजासाठी ही प्रसिद्ध गायिका पिते स्पर्म कॉकटेल, ऐकून इंडस्ट्री हादरली
singer
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 01, 2025 | 6:32 PM

मधून आवाज जपण्यासाठी गायक प्रचंड काळजी घेत असतात. आयस्क्रीम किंवा थंड खाणे, आंबट खाणे या सर्व गोष्टी कटाकक्षाने पाळताना दिसतात. तसेच देवाच्या वरदानाप्रमाणे असलेला गोड गळा जपण्यासाठी अनेकजण डायट फॉलो करतात. एका प्रसिद्ध गायिकेने आवाज जपण्यासाठी जे काही केलं आहे ते ऐकून तुम्हाला किळसही वाटेल. ही प्रसिद्ध अभिनेत्री एक ड्रिंक पिते. ते ऐकून संपूर्ण इंडस्ट्री हादरली आहे.

प्रसिद्ध अमेरिकन गायिका जेसिका सिम्पसन ही तिचा आवाज जपण्यासाठी एक सिक्रेट ड्रिंक पिते. 44 वर्षांची ‘स्वीट किसेस’ आणि ‘इन द स्किन’ फेम गायिकेनं दावा केला आहे की, तिला तिच्या वोकल कॉर्ड जपण्यासाठी चिनी हर्बल कॉकटेल प्यायचं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या चिनी हर्बल कॉकटेलमध्ये सापाचे स्पर्म्स असतात. याविषयी बोलताना ती म्हणाली, ‘ही हर्बल ड्रिंक मला वोकल कोचने माहिती दिली.’

वाचा: Ghibli ॲनिमेशन कुठून आले? त्याचा मालक कोण आहे? त्याची एकूण संपत्ती वाचून जाल चक्रावून

गायिकेने शेअर केला व्हिडीओ

जेसिकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने चिनी हर्बल ड्रिंकविषयी खुलासा केला आहे. या ड्रिंकमध्ये सापाचे स्पर्म असल्याचे तिने सांगितले आहे. व्हिडीओमध्ये जेसिका बोलताना दिसत आहे की, हर्बल ड्रिंकमध्ये सापाचे स्पर्म्स मिसळलेले असतात, यासंदर्भातही तिला फारशी माहिती नव्हती. पण जेव्हा तिच्या एका मैत्रिणीनं तिला त्यातील घटकांची यादी दाखवली, तेव्हा तिलाही धक्का बसला. गायिकेनं केलेलं वक्तव्य आणि शेअर केलेला व्हिडीओ पाहून तिचे चाहते आवाक झाले आहेत.

‘मधासारखे गोड लागते’

जेसिका व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे की, ‘मला एकदा कुणीतरी विचारलं होतं की मी काय पित आहे? त्यावर मी उत्तर दिले की, हे एखाद्या औषधी वनस्पतीसारखं काही तरी आहे. माझ्या व्होकल कोचनं मला हे पेय पिण्याचा सल्ला दिला. या पेयामध्ये सापाचे स्पर्म्स असतात. जर तुला उत्तम वोकल हवं असेल तर, तुम्हाला सापाचे स्पर्म्स प्यावे लागतील. हे पेय मधासारखे गोड लागते.’