‘छावा’ अखेर OTT वर प्रदर्शित, पण सिनेमाने का केलं प्रेक्षकांना नाराज?

Chhaava Movie Ott Release: 'छावा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर राज्य केलं, पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होताच सिनेमाने चाहत्यांना का केलं नाराज? सध्या सर्वत्र 'छावा' सिनेमाचीच चर्चा...

छावा अखेर OTT वर प्रदर्शित, पण सिनेमाने का केलं प्रेक्षकांना नाराज?
| Updated on: Apr 13, 2025 | 11:01 AM

Chhaava OTT Release: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमाने फक्त भारतातच नाही तर, जगभरात नवे विक्रम रचले आहेत. ‘छावा’ सिनेमा यंदाच्या वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. 14 फेब्रुवारी 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पन्नास दिवसांपेक्षा अधिक दिवस सिनेमा चित्रपटगृहातील स्क्रिनवर झळकत होता. अखेर सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे अनेकांनी घरबसल्या सिनेमा पाहिला. पण अनेक प्रेक्षकांची मात्र निराशा झाली आहे. सांगायचं झालं तर, बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ सिनेमाने राज्य केलं. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमाला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.

सांगायचं झालं तर, 11 एप्रिल रोजी सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील सिनेमाचा बोलबाला असेल असं अनेकांना वाटलं. पण तसं काही झालं नाही. त्यामागे कारण आहे भाषा… ‘छावा’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म फक्त हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. अन्य भाषेत देखील सिनेमा प्रदर्शित होईल असं अनेक प्रेक्षकांना वाटलं होतं पण तसं काही झालं नाही.

प्रेक्षक का आहेत नाराज?

‘छवा’ हा सिनेमा हिंदी तसेच तेलुगू भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला, ज्यामुळे सिनेमाने चांगली कमाई केली. पण ओटीटी रिलीजमध्ये, छावा फक्त हिंदी भाषेत उपलब्ध आहे, ज्यामुळे लोक खूप संतापले आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट नेटफ्लिक्सवर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा होती पण तसं झालं नाही.

‘छावा’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा 2025 मध्ये प्रदर्शित झाला. सिनेमाने अनेक सिनेमांचा रेकॉर्ड देखील ब्रेक केला आहे. फक्त भारतात सिनेमाने 594 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात सिनेमाने 800 कोटींचा गल्ल जमा केला आहे.

‘छावा’ सिनेमाची कथी आणि कास्ट

छावा हा सिनेमा मराठा साम्राज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात संभाजीची भूमिका विक्की कौशलने साकारली होती आणि त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. सिनेमात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.