AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anupam Kher | अनुपम खेर यांचा टॅटू पाहून चाहत्यांना धक्का, चक्क शरीराच्या ‘या’ भागावर अभिनेत्याने…

अनुपम खेर हे त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अनुपम खेर हे सोशल मीडियावरही सक्रिय असतात. नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अनुपम खेर हे दिसतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे ते चर्चेत आहेत.

Anupam Kher | अनुपम खेर यांचा टॅटू पाहून चाहत्यांना धक्का, चक्क शरीराच्या 'या' भागावर अभिनेत्याने...
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 17, 2023 | 4:11 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे नेहमीच चर्चेत असतात. विशेष म्हणजे अनुपम खेर यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. अनुपम खेर हे सोशल मीडियावर खास व्हिडीओ (Video) आणि फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. अनुपम खेर हे आपल्या आगामी चित्रपटाचे देखील प्रमोशन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच करतात. काही दिवसांपूर्वीच सतीश काैशिक यांच्या मुलीचा वाढदिवस होता, तिच्या वाढदिवसाबद्दल अनुपम खेर यांनी शुभेच्छा देत एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर (Social media) शेअर केली होती. सतीश काैशिक यांच्या निधनाच्या बातमीची पोस्ट सर्वांत अगोदर अनुपम खेर यांनी शेअर केली होती.

अनुपम खेर हे सतीश काैशिक यांच्या निधनानंतर ढसाढसा रडताना देखील दिसले होते. अनुपम खेर आणि सतीश काैशिक हे दोघे खूप चांगले मित्र होते. काही दिवसांपूर्वीच अनुपम खेर यांनी त्यांच्या आगामी रवींद्रनाथ टागोर या चित्रपटामधील पहिला लूक चाहत्यांसोबत शेअर केला. यानंतर अनेकांनी त्यांचे काैतुक देखील केले होते.

नुकताच अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ हा शेअर केला आहे. अनुपम खेर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ आता तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनुपम खेर यांनी चक्क डोक्यावर टॅटू काढलायं. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी एक खास कॅप्शन देखील लिहिले आहे.

anupam kher

अनुपम खेर म्हणाले की, माझा हा व्हिडीओ जगभरातील टक्कल असलेल्या लोकांसाठी आहे. ज्या लोकांना डोक्याला केस आहेत, त्यांना वाटते की, ते काहीही करू शकतात. परंतू तुम्ही हे करू शकता? कधीच नाही. आता अनुपम खेर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

अनेक लोक या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, मला या टॅटूची डिझाईन खूपच जास्त आवडलीये. दुसऱ्याने लिहिले की, खरोखरच हा टॅटू खूपच जास्त मस्त तयार करण्यात आलाय. अजून एकाने लिहिले की, मला वाटते की हा टॅटू अनुपम खेर यांनी आगामी चित्रपटासाठी तयार केला आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!