Anupam Kher | ‘शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचे वाटते’,अनुपम खेर यांचे धक्कादायक विधान

| Updated on: Dec 07, 2020 | 11:15 AM

बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर यांनी नवीन कृषी कायद्यांविरोधात एक मोठ धक्कादायक विधान केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सरकारने शेतकऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत त्या ऐकल्या पाहिजेत. मात्र, कधी कधी हे शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचे वाटते.

Anupam Kher | शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचे वाटते,अनुपम खेर यांचे धक्कादायक विधान
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर यांनी नवीन कृषी कायद्यांविरोधात एक मोठ धक्कादायक विधान केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सरकारने शेतकऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत त्या ऐकल्या पाहिजेत. मात्र, कधी कधी हे शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचे वाटते. आंदोलनामध्ये सरकारच्या निषेधार्थ दाखवण्यात आलेले खलिस्तानी झेंडे ही एक चिंतेची गोष्ट आहे. ( farmers movement seems to be politically motivated’, Anupam Kher)

हे आंदोलन काही लोक हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलन हायजॅक होत असल्याचे पाहुण दुःख होत आहे. आपल्या देशात शेतकऱ्याला देव मानले जाते. ते आपले अन्नदाता आहेत त्यांनी आपल्या देशासाठी जे काही केले त्याबद्दल मी त्याच्या आभारी आहे. अनुपम खेर पुढे म्हणाले की, काही लोक ज्यांना या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे काहीच देणे घेणे नाही तेही यामध्ये हात धुऊन घेत आहेत. शेतकरी त्यांचा अजेंडा ठेवूनच काम करत आहेत. मात्र काही लोकांमुळे आंदोलनाची दिशा बदलण्याची भिती वाटत आहे. जो कोणी अन्न खातो तो शेतकऱ्यांच्या या आंदोलनात शेतकऱ्याना साथ देईल.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी बिलाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. 26 नोव्हेंबरपासून शेतकरी आपल्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. आतापर्यंत शेतकरी आणि सरकार यांच्यात बर्‍याच चर्चा झाल्या आहेत. मात्र यामधून मार्ग काहीच निघाला नाही. बुधवारी सरकार आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत शेतकरी आंदोलना संदर्भात तिने केलेले आक्षेपार्ह ट्विट यामुळे चर्चेत आली होती. आक्षेपार्ह ट्विटमुळे कंगनाला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली. याच दरम्यान सोशल मीडिया यूजर्सने कंगनाला टार्गेट करण्यास सुरू केली होती.
पंजाबच्या लुधियाना येथील कॉंग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांचे एक ट्विट जोरदार व्हायरल होत होते. या ट्विटमध्ये खासदार बिट्टू यांनी कंगना रनौतला हिमाचलचे सडलेले सफरचंद म्हटले होते.
या विषयावर बोलताना खासदार बिट्टू म्हणाले होते की, मला कंगनाला हे स्पष्ट सांगायचे आहे की, आमच्या पंजाबी लोकांमध्ये शेकडो समस्या असतील परंतु आम्ही बाहेरील लोकांना आमच्यामध्ये कधीच घुसू देत नाहीत. मला खात्री आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्याप्रमाणे विरोध केला त्यानंतर हिमाचलमध्ये कंगनाच्या प्रवेशावर बंदी घातली जाईल आणि हिमाचलमधील तरुणांनी कंगनाला धडा शिकवेल यानंतर कंगना लपून बसण्यासाठी फक्त नरेंद्र मोदींच्या घरी जाऊ शकेल. आता अनुपम खेर यांच्या या विधानामुळे काय हंगामा होणार हे पाहण्यासारख आहे.

संबंधित बातम्या : 

Paurashpur | फिटनेस फ्रीक मिलिंद सोमणचा किलींग लूक, तुम्ही पाहिलात का?

Shocking : अभिनेत्री दिव्या भटनागरचं निधन, कोरोनामुळे संपली आयुष्याची लढाई

( farmers movement seems to be politically motivated, Anupam Kher)