Kangana Ranaut | कंगना रनौतचा ‘तो’ जुना व्हिडिओ व्हायरल, पाहा काय आहे प्रकरण!

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगना रनौत चर्चेत असून आहे. त्याचे कारण म्हणजे शेतकरी आंदोलना संदर्भात तिने केलेले आक्षेपार्ह ट्विट, या आक्षेपार्ह ट्विटमुळे कंगनाला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली आहे.

Kangana Ranaut | कंगना रनौतचा 'तो' जुना व्हिडिओ व्हायरल, पाहा काय आहे प्रकरण!
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 3:39 PM

मुंबई :  बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या चर्चेत असून आहे. त्याचे कारण म्हणजे शेतकरी आंदोलना संदर्भात तिने केलेले आक्षेपार्ह ट्विट, या आक्षेपार्ह ट्विटमुळे कंगनाला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली आहे. याच दरम्यान सोशल मीडिया यूजर्सने कंगनाला टार्गेट करण्यास सुरू केली आहे. सोशल मीडियावर एका यूजर्सने कंगनाचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. (Kangana Ranaut’s he old video goes viral)

जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तो, ‘रंगून’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये गेली होती त्यावेळचा आहे. कॉमेडियन कपिल शर्माने कंगनाला विचारले होते की, “तुम्ही सोशल मीडिया का वापरत नाहीत?” त्यावर कंगना म्हणाली होती की, “मला असे वाटते की सोशल मीडियावर रिकामे लोक जास्त असतात ज्यांना काहीच काम नसते. कारण ज्यांना काम असते त्यांच्याकडे वेळ नसतो सोशल मीडियावर टाईमपास करण्यासाठी ”

View this post on Instagram

A post shared by Sudhanshu (@_memeland_69___)

हा व्हिडिओ शेअर करताना यूजर्सने कंगनाला आठवण करून  दिली आहे की, आता तु पण त्याच लोकांच्या वर्गात सामील झाली आहेस. कंगनाच्या टाइमलाइनवर आपण नजर टाकल्यास लक्षात येईल की, कंगनाचे 100 पैकी 90 ट्विट हे कोणाला तरी टार्गेट करणारेच असतात. आता या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ विषयी कंगना काय प्रतिक्रिया देते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंजाबच्या लुधियाना येथील कॉंग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांचे एक ट्विट जोरदार व्हायरल होत होते. या ट्विटमध्ये खासदार बिट्टू यांनी कंगना रनौतला हिमाचलचे सडलेले सफरचंद म्हटले होते. या विषयावर बोलताना खासदार बिट्टू म्हणाले होते की, मला कंगनाला हे स्पष्ट सांगायचे आहे की, आमच्या पंजाबी लोकांमध्ये शेकडो समस्या असतील परंतु आम्ही बाहेरील लोकांना आमच्यामध्ये कधीच घुसू देत नाहीत. मला खात्री आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्याप्रमाणे विरोध केला त्यानंतर हिमाचलमध्ये कंगनाच्या प्रवेशावर बंदी घातली जाईल आणि हिमाचलमधील तरुणांनी कंगनाला धडा शिकवेल यानंतर कंगना लपून बसण्यासाठी फक्त नरेंद्र मोदींच्या घरी जाऊ शकेल

संबंधित बातम्या : 

कंगना रनौत विरोधात जावेद अख्तर यांचा अब्रू नुकसानीचा दावा, मुलाखतींमधून बदनामी केल्याचा आरोप

Kangana Ranaut | ‘मिर्झापूर 2’ बघून निकिता तोमर हत्याकांड घडल्याचा दावा, कंगना रनौतची पुन्हा बॉलिवूडवर टीका!

(Kangana Ranaut’s he old video goes viral)

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.