Kangana Ranaut | ‘मिर्झापूर 2’ बघून निकिता तोमर हत्याकांड घडल्याचा दावा, कंगना रनौतची पुन्हा बॉलिवूडवर टीका!

निकिता तोमर हत्याकांडाच्या तपासा दरम्यान, आरोपीने ‘मिर्झापूर 2’ बघून निकिताची हत्या केल्याचे सांगितले जात असल्याचा दावा केला जात आहे.

Kangana Ranaut | ‘मिर्झापूर 2’ बघून निकिता तोमर हत्याकांड घडल्याचा दावा, कंगना रनौतची पुन्हा बॉलिवूडवर टीका!

मुंबई : हरियाणातील निकिता तोमर हत्याकांडामुळे अवघा देश हादरला आहे. आरोपी तौसीफचे प्रेम नाकारल्याने, त्याने निकिताला गोळी मारून तिची हत्या केल्याचा प्रकार हरियाणात घडला आहे. या दरम्यान, सदर घटनेचा लोकप्रिय वेब सीरीज ‘मिर्झापूर 2’शी (Mirzapur 2) संबंध जोडण्यात येत आहे. यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana ranaut) देखील या वादात उडी घेत पुन्हा एकदा बॉलिवूडवर टीकास्र सोडले आहे. ‘गुन्हेगारांचा जेव्हा गौरव केला जातो…’, असे म्हणत तिने ‘मिर्झापूर 2’वर टीका केली आहे.(Kangana Ranaut Slam Mirzapur 2 after Nikita Tomar case)

निकिता तोमर हत्याकांडाच्या तपासा दरम्यान आरोपीने ‘मिर्झापूर 2’ बघून निकिताची हत्या केल्याचे सांगितले जात असल्याचा दावा केला जात आहे. या वृत्तानंतर कंगना रनौत पुन्हा एकदा बॉलिवूडवर बरसली आहे. ‘मिर्झापूर’ या लोकप्रसिद्ध वेब सीरीजचे दुसरे पर्व नुकतेच ओटीटी वर प्रदर्शित झाले आहे. या सीरीजच्या दुसऱ्या पर्वालाही तूफान प्रसिद्धी मिळत आहे.

गुन्हेगारांचा गौरव होतोय…

कंगनाने निकिता तोमर हत्याकांडावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘बॉलिवूड’ला ‘बुलिवूड’ म्हणत तिने पुन्हा एकदा मनोरंजन विश्वावर टीका केली आहे. या प्रकरणावर ट्विट करताना कंगना म्हणाली, ‘जेव्हा आपण गुन्हेगारांचा गौरव करतो, तेव्हा अशाच गोष्टी घडतात. जेव्हा राजबिंडा दिसणार तरुण नायक नकारात्मक आणि गुन्हेगारी प्रवृत्ती दाखवणारी भूमिका साकारतो, त्याला खलनायक दाखविण्याऐवजी अँटी-हिरो म्हणून समोर आणले जाते तेव्हा परिमाण असेच होतात. चांगल्यापेक्षा वाईटच गोष्टी जास्त दिल्या आहेत, याची या ‘बुलिवूड’ला लाज वाटली पाहिजे’.(Kangana Ranaut Slam Mirzapur 2 after Nikita Tomar case)

कंगना रनौतने बॉलिवूडवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. ‘मिर्झापूर 2’ सारख्या वेब सीरीजमुळे समाजावर वाईट परिणाम होतो, असे तिने अप्रत्यक्षरीत्या म्हटले आहे. या अशा गुन्हेगारी प्रवृत्ती ‘हिट’ ठरत असल्याने अधिक नुकसान होत असल्याचे तिने म्हटले आहे.

बॉलिवूडकर पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर

कंगना रनौतने निकिता तोमर हत्याकांडावर प्रतिक्रिया देत, संपूर्ण बॉलिवूडवर टीका केली आहे. या प्रकरणावर भाष्य करत कंगनाने करिना कपूर खान, स्वरा भास्कर, सोनम कपूर, राधिका आपटे आणि रिचा चड्ढा यांसारख्या बॉलिवूडमधील काही दिग्गज अभिनेत्रींवरही निशाणा साधला. या प्रकरणावर बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींपैकी एकीनेही प्रतिक्रिया न दिल्याने, कंगना रनौत त्यांच्यावर संतापली आहे.

यादरम्यान कंगनाने आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये तिने म्हटले की, ‘या नकली आणि निवडक ठिकाणी बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकले पाहिजे. या लोकांमुळेच महिला सक्षमीकरणाला मोठा धोका निर्माण होतो आहे. एका जिहादीच्या गोळीला बळी पडलेल्या निकिताच्यावेळी या सगळ्यांच्या तोंडाला सील लागले आहे’.

(Kangana Ranaut Slam Mirzapur 2 after Nikita Tomar case)

Published On - 11:42 am, Sun, 1 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI